अभय नरहर जोशी - पुणे : चीनचा विशेष प्रशासकीय प्रदेश असलेल्या हाँगकाँग चीनचा प्रदेश असून आणि चीनच्या एवढ्या जवळ असूनही जगभर थैमान घालत असलेल्या 'कोविड १९' म्हणजेच कोरोना विषाणूच्या साथीची तुलनेने खूपच कमी झळ बसली आहे. या प्रदेशात २ एप्रिलअखेरपर्यंत ८०२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून चार जणांचा या रोगाने बळी घेतला आहे. मूळचे मुंबईकर असलेले तेथील सिटी बँकेतील अधिकारी मंगेश रेळेकर यांच्याशी 'लोकमत'ने साधलेल्या संवादातून ही माहिती मिळाली.ब्रिटिशांकडून १९९७ मध्ये चीनमध्ये विलीन झालेल्या मात्र अद्याप स्वायत्त असलेल्या हाँगकाँगवासियांचा चिनी सत्ताधाऱ्यांशी तीव्र संघर्ष सुरू होता. मात्र हे आंदोलन नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ दरम्यान थंड होत नाही तोच जानेवारीपासून कोरोनाच्या साथीविषयीच्या बातम्या चीनमधून येऊ लागल्या. तरीही येथील जनजीवन सुरळीत सुरू होते. या वर्षीच्या १५ मार्चपर्यंत हाँगकाँगमध्ये २०० च्या आसपास कोरोनाबाधित होते, अशी माहिती देऊन रेळेकर यांनी सांगितले, की आता ही संख्या ८०० च्या दरम्यान जरी गेली असली तरी या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण येथे खूप कमी आहे. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे.
Corona virus : हाँगकाँगचे 'लॉकडाऊन' विना कोरोनावर नियंत्रण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 13:11 IST
ठप्प न होता आवश्यक खबरदारी घेऊन दैनंदिन जनजीवन सुरळीत
Corona virus : हाँगकाँगचे 'लॉकडाऊन' विना कोरोनावर नियंत्रण!
ठळक मुद्दे २ एप्रिलअखेरपर्यंत ८०२ जणांना कोरोनाची बाधा झाली असून चार जणांचा या रोगाने बळी ट्रेन, बस ही सार्वजनिक वाहतूकही अव्याहत सुरू शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे, जिम अशी सार्वजनिक गर्दीची ठिकाणे बंद