शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

Corona virus : कोरोनाग्रस्तांची सविस्तर माहिती घेण्याचे पुणे महापालिकेचे संबंधित रुग्णालयांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 18:52 IST

रुग्णालयांनी सहा तासांच्या आत माहिती कळविणे बंधनकारक

ठळक मुद्देपरदेश वारीसह आजारांची घेणार हिस्ट्री रुग्ण शोधणे व उपचार करण्यास होणार मदत कोरोना केसेसमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा अत्यंत महत्वाचा भाग

पुणे : पुण्यातील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत चालला असून नवीन रुग्णांना शोधण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर आहे. शहरातील ११ खासगी रुग्णालये, ससून सर्वोपचार रुग्णालय, पालिकेचे डॉ. नायडू रुग्णालय आणि औंध शासकीय रुग्णालयात कोरोना बधितांवर उपचार केले जात आहेत. परंतु बऱ्याच ठिकाणी रुग्णांची परदेश प्रवासाची आणि आजारांची माहिती व्यवस्थित घेतली जात नाही. ही माहिती विस्तृत स्वरूपात घेण्याच्या आणि ही माहिती रुग्ण उपचारांसाठी दाखल होताच सहा तासांच्या आत पुणे महापालिकेला पाठविण्याच्या सूचना सर्व संबंधित रुग्णालयांना केल्या आहेत.

संबंधित रुग्णालयांनी कोरोना आजाराच्या रूग्णांची विस्तृत स्वरूपाची सर्व 'ट्रॅव्हल हिस्ट्री' तातडीने घेणे अनिवार्य आहे. जेणेकरून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधणे व त्यांना तातडीने पुढील कार्यवाहीसाठी रूग्णालयात आणणे अथवा विलगिकरण करणे अधिक सोईस्कर होईल. रुग्णालयांनी हे काम अतिशय तत्परतेने केल्यास 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' वेळेत होऊ शकेल. त्यामुळे संबंधितांवर उपचार करण्यास लवकर सुरुवात होऊ शकते. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या सर्व वैदयकिय अधिकाऱ्यांना याबाबत सुचित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्व रुग्णांची विस्तृत स्वरूपाचा तपशील घेण्यात यावा. जसे संशयित किंवा कोरोना झालेल्या व्यक्ती दाखल झाल्यानंतर या रूग्णांची मेडिकल व इफिडिमी ओलॉजीकल हिस्ट्री अतिशय सखोल घेणे आवश्यक आहे. हिस्ट्री घेताना सर्व रूग्णांची दिवस निहाय व रूग्णाला लक्षणे सुरू होण्याच्या ३ दिवस आगोदर पासून ते रूग्णालयामध्ये दाखल होईपर्यंतची दिनचर्या अतिशय विस्तृतपणे घेणे आवश्यक करण्यात आली आहे. संबंधित रूग्ण कोणाकोणास भेटला, किती वेळ प्रत्येकाबरोबर व्यतीत केला, त्या रूग्णाने काय काय केले याची इतंभुत माहिती प्रत्येक तासागणिक घेणे आवश्यक आहे. ही माहिती 'हिस्ट्री शिट' मध्ये नमुद करणे आवश्यक असून ही माहिती घेताना 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट' आणि ' लो रिस्क कॉन्टॅक्ट' याचा पूर्ण तपशील नाव, पत्ता, फोन नंबर इत्यादीसह नमुद करणे अत्यावश्यक आहे.

कोरोना केसेसमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने कॉन्टॅक्टची सर्व माहिती वेळ न दवडता कळविणे आवश्यक आहे. ही माहिती पालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांना सहा तासांच्या आत कळविण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही माहिती मिळताच सर्वेक्षण अधिकारी सर्व कॉन्टॅक्ट शोधून त्यांची तपासणी करण्याचे नियोजन करणार आहेत. ----------------- रुग्णालयांनी सहा तासांच्या आत माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सहा तासांच्या आत माहिती प्राप्त न झाल्यास सर्वस्वी जबाबदारी रूग्णालयाची असेल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका