शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Corona virus : पुण्यातील गणेश मंडळे भक्तांसाठी तयार करणार नवीन आचारसंहिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 21:56 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ही आचार संहिता असणार आहे. 

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांबरोबर गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक

पुणे : गणेशात्सव साजरा करताना दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी कशी व्यवस्था असावी, फिजिकल डिस्टेन्सिंग कसे पाळता येईल. उत्सव साधेपणाने कसा साजरा करता येईल, याविषयी गणेश मंडळे आचार संहिता तयार करणार आहेत. शासनाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार ही आचार संहिता असणार आहे. शहर पोलीस आणि प्रमुख मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.शहरात कोरोना संसर्गाची व्यापी दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सव एक महिन्यावर आला असून त्याची तयारी आता सुरु आहे. या कोरोना संकटात गणेशोत्सव साजरा करताना काय केले पाहिजे. गणेश मंडळांची काय भूमिका आहे, हे जाणून घेण्यासाठी आज ही बैठक झाली. या बैठकीत सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्याचा अर्थ सार्वजनिक गणेश मंडळांना उत्सवासाठी परवानगी देण्यात आली आहे. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीना परवानगी नसणार आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच शहरात सुमारे साडेतीन लाख घरांमध्ये गणरायाचे आगमन होते. विसर्जनाच्या दिवशी त्यांची नदी काठी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी नागरिकांना घरीच विर्सजनाचे आवाहन करावे, असे यावेळी सांगण्यात आले.पुण्यातील गणेश मंडळाने उत्सव मूर्तीचे विसर्जन करत नाही़. त्यामुळे शासनाचा नियम येथे लागू होत नाही. पोलीस आयुक्त व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले़ तसेच गणेश मंडळांनीच भाविकांसाठी आचार संहिता तयार करावी, असे त्यावर प्रशासनाबरोबर एकत्र बसून सर्वांना सोयीने साधेपणाने उत्सव कसा साजरा करता येईल, हे निश्चित करण्याचा यावेळी ठरले. ़़़़़़़़शहरातील कोरोनाच्या सावटाखाली होणाऱ्या गणेशोत्सवात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधावा. उत्सव साधेपणाने कसा साजरा करता येईल, यावर विचार करुन त्यांचे म्हणणे समजावून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.......पोलिसांची भूमिका सकारात्मक आहे. भाविकांसाठी आचारसंहिता मंडळे एकत्र येऊन तयार करणार आहेत. दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा सर्व रोषणाई रद्द केली आहे. फक्त उत्सव ठिकाणी मध्ये महिरप असणार आहे.तसेच मान्यवरांच्या हस्ते होणाऱ्या आरत्याही रद्द केल्या आहेत. हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी सर्व जण एकत्र प्रयत्न करीत आहोत.महेश सूर्यवंशी, कोषाध्यक्ष, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारGanesh Mahotsavगणेशोत्सव