शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona virus : पुणे महापालिकेच्या इतिहासातील पहिली 'ऑनलाईन सभा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 20:25 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकांच्या बैठका, मुख्य सभा ऑनलाईन घेण्यासंदर्भात राज्य शासनाने निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देबहुतांश नगरसेवकांची ऑनलाईन उपस्थिती ;  गटनेते, पदाधिकारी आणि मोजके नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित 

पुणे : महापालिकेच्या इतिहासातील पहिली 'व्हर्च्युअल' मुख्य सभा शुक्रवारी पार पडली. या मुख्यसभेला बहुतांश नगरसेवकांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. तर, विविध पक्षांचे गटनेते, पदाधिकारी आणि काही मोजके नगरसेवक या सभेला प्रत्यक्ष उपस्थित होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका, नगरपरिषदा आणि महापालिकांच्या विविध विषय समित्यांच्या बैठका, मुख्य सभा ऑनलाईन घेण्यासंदर्भात राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेनेही मुख्य सभा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या इतिहासातील पहिल्याच ऑनलाईन मुख्यसभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सभापती, गटनेते, पदाधिकारी, अधिकारी, नगरसचिव, नगरसचिव कार्यालयातील कर्मचारी आणि ऑनलाइनची सेवा पुरवणारे तंत्रज्ञ यांचीच सभागृहात उपस्थिती होती. सभापती म्हणून उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी काम पाहिले. सभा सुरू झाल्यानंतर मनसेचे गटनेते वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी कोटरर्सच्या बिलांसंदर्भात सभागृहात हातामध्ये फलक घेऊन आंदोलन केले. परंतु, बहुतांश नगरसेवक ऑनलाईन असल्याने सर्वचजण बोलण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ऑनलाईन असलेले विविध पक्षांचे नगरसेवक बोलत असताना गटनेते मात्र सभागृहात शांत बसून होते. त्यामुळे नगरसेवकांच्या प्रश्नांची फारशी गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. सभा तहकुबी मांडताना ऑनलाइन असलेल्या सदस्यांनी विरोध केला, परंतु, सभागृहातील गटनेत्यांनी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विरोध न केल्याने सभा तहकूब करण्यात आली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMayorमहापौरcommissionerआयुक्त