शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Corona virus : ससूनमधील कोरोनाबाधित मृतांचा आकडा पाचशे पार; बरे झालेल्या रुग्णांची संख्या पण दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 08:31 IST

शहरातील एकुण मृत्यूपैकी ३८ टक्के प्रमाण

ठळक मुद्देमागील काही दिवसांपासून ससून रुग्णालयामध्ये आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्येत वाढ

पुणे : ससून रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा शुक्रवारी ५०० पार गेला. शहरातील एकुण मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण ३८ टक्के एवढे आहे. मात्र, त्याचबरोबर रुग्णालयातील घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्याही मृतांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. सुरूवातीपासूनच ससून रुग्णालयामध्ये गंभीर रुग्ण सर्वाधिक असल्याने तेथील मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. 

पुण्यात कोरोना रुग्ण आढळून येऊ लागल्यानंतर सुरूवातीला नायडू रुग्णालयात दाखल केले जात होते. पण रुग्णांची प्रकृती ढासळू लागल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सुरूवात झाली. दि. २ एप्रिल रोजी रुग्णालयात पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर केवळ १४ दिवसातच ३४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही प्रमाणात मृत्यू कमी झाल्याने शंभरी गाठण्यासाठी एक महिना लागला. दि. १६ मे रोजी रुग्णालयात शंभरावा रुग्ण दगावला. त्यावेळचा मृत्युदर ३५.०८ टक्के एवढा होता. दि. १४ जूनपर्यंत मृतांचा आकडा २०३ पर्यंत गेला. त्यानंतर मात्र दाखल गंभीर रुग्णांसह मृत्यूचे प्रमाणही वाढत गेले. दि. ९ जुलै ३०३ मृत्यूनंतर पुढचे १०० मृत्यू १४ दिवसात झाले. तर ५०० चा आकडा पार करण्यासाठी केवळ नऊ दिवस लागले. 

मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालयामध्ये आॅक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून गंभीर रुग्णांना दाखल करण्यासाठी ससून रुग्णालयाला प्राधान्य दिले जाते. रुग्णालयातील मृत्यूपैकी अनेक मृत्यू विलंबाने आल्याने झाले आहेत. तसेच मृतांमध्ये अन्य गंभीर आजार असलेल्या रुग्णांचाही समावेश जास्त आहे. त्यामुळे शहरातील एकुण मृतांपैकी ३८ टक्के मृत्यू एकट्या ससूनमध्ये झाले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल करण्यास उशिराने सुरूवात झाल्याने तेथील मृत्यू तुलनेने कमी आहेत. तसेच या रुग्णालयांची क्षमताही ससूनच्या तुलनेत कमी आहे.--------------सर्वाधिक व्हेंटिलेटरससून रुग्णालयामध्ये सध्या ८७ व्हेंटिलेटर बेड आहेत. शहरात अन्य कोणत्याही कोविड रुग्णालयामध्ये एवढे व्हेंटिलेटर नाही. त्यापाठोपाठ दिनानाथ रुग्णालयात ३० तर रुबी हॉल क्लिनिकमध्ये २७ व्हेंटिलेटर असल्याचे डॅशबोर्डवर दिसते. ससूनमध्ये आॅक्सिजन बेडही २२६ एवढे आहेत. आॅक्सिजनसह सर्व व्हेंटिलेटर व आयसीयु बेडवर रुग्ण असल्याने गंभीर रुग्णांची संख्या याच रुग्णालयात सर्वाधिक आहे. ----------विभागीय डॅशबोर्डनुसार ससूनची सद्यस्थिती -एकुण बेड - ४४६आॅक्सिजनरहित बेड - १२५आॅक्सिजनसहित बेड - २२६ व्हेंटिलेटररहित आयसीयु - ८व्हेंटिलेटर - ८७-----------रुग्णालयातील मृत्युची स्थितीदिवस ससून मृत्यू शहरातील एकुण मृत्यू१६ मे १०० १८५१४ जून २०३ ४४८९ जुलै ३०३ ७८६२२ जुलै ४०६ १०६८३१ जुलै ५०१ १२८४ (30 june)--------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू