शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : पुण्यात कोरोना बाधितांचा आकडा एक हजारावर, आतापर्यंत ६९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 22:30 IST

CoronaVirus : आज आणखी १३ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, शहरातील एक हजार रूग्णांमागे १५९ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

पुणेपुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा आज एक हजाराच्या पार गेला. शनिवारी नव्याने आढळून आलेल्या ९० रूग्णांमुळे पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीतील) कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ९० झाली आहे तर आज आणखी पाच जणांचा बळी कोरोनाने घेतला असून, शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण मृत्यूची संख्या ६९ झाली आहे. दरम्यान, आज आणखी १३ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, शहरातील एक हजार रूग्णांमागे १५९ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या पाहता बरे होण्याचे प्रमाण पुणे शहरात १४.८५ टक्के आहे व मृत्यूदर ६.४ टक्के आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या सलग दोन दिवस शंभरच्या पुढेच वाढत असताना, ९ मार्च रोजी पहिला कोरोनाचा रूग्ण ज्या शहरात सापडला तेथे आज दीड महिन्यानंतर हाच आकडा एक  हजाराच्या पुढे गेला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठपर्यंत ९० नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी ७९ रूग्ण पालिकेच्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये व पालिकेने उभारलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये २ दोन दाखल झाले आहेत. 

पुणे शहरातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ६९ झाली आहे. आज मृत्यू झालेल्या चार रूग्णांपैकी भारती हॉस्पिटलमधील ४३ वर्षीय व्यक्ती वगळता अन्य चार रूग्ण हे ५० च्या पुढील आहेत. यामध्ये ससूनमधील ५५ वर्षीय महिलेचा व ७२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. तर एका ६० वर्षीय महिलेचा औंध जिल्हा रूग्णालयात व ६८ वर्षीय पुरूषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. 

सध्या पुणे शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ४५ कोरोनाबाधित रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर आज नायडू हॉस्पिटलमधील ६ जणांना, ससून हॉस्पिटलमधील एकास व खाजगी हॉस्पिटलमधील ६ जणांना उपचाराअंती कोरोनामुक्त म्हणून घरी सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे