शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे महापालिकेच्या ‘मार्च एंड’वर कोरोनाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 19:00 IST

महापालिकेच्या विविध विकासकामांची बिले काढून घेण्याकरिता ठेकेदारांची लगबग सुरू

ठळक मुद्दे४०० ते ५०० कोटींची बिले :  लेखापरीक्षण विभागावर वाढला ताण

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारी कार्यालयांमधील कर्मचारी संख्या थेट ५0 टक्क्यांवर आणल्याने शासकीय कामांचा खोळंबा होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या विविध विकासकामांची बिले काढून घेण्याकरिता ठेकेदारांची लगबग सुरू असून, ३१ मार्चनंतर नवे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे यंदाच्या पालिकेच्या ‘मार्च एंड’वर कोरोनाचे सावट घोंगावत आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकाने सात हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दरवर्षी पालिकेकडून शहरात विकासकामे केली जातात. रस्ते, पाणी, मलनि:सारण, विद्युत आदी कामे केली जातात. ठेकेदारांमार्फत होणारी ही कामे वेळेत आणि दर्जेदार व्हावीत याकडेही लक्ष देणे आवश्यक असते. नगरसेवकांच्या निधीमधून ही कामे केली जातात. यासोबतच प्रशासनाकडूनही काही कामे सुचवली जातात. दर वर्षी सरासरी ४०० ते ५०० कोटी रुपयांची बिले ही एकट्या ३१ मार्चच्या आसपास येतात. पालिकेच्या लेखापरीक्षण विभागाकडून या बिलांची पडताळणी केली जाते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बिले आणि कामाच्या फाईल्स येण्याचे प्रमाण वाढते. या कालावधीत लेखापरीक्षण विभागाला रात्री उशिरापर्यंत काम करावे लागले. उपलब्ध मनुष्यबळही कमी पडू लागते. सध्या कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजलेला असतानाच पालिकेमध्ये मार्च एंडची लगबग सुरू आहे.  ३१ मार्चपर्यंत शहरातील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने कलम १४४ लागू केलेले आहे. त्यामुळे अन्य व्यवहार व विकासकामेही ठप्प आहेत. ठेकेदारांना कामे करणे आणि त्याची बिले वेळेत सादर करणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर या आर्थिक वर्षातील बिले अदा करणे ३१ मार्चपर्यंत शक्य होणार आहे की त्यासाठी मुदतवाढ घेण्यात येणार, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प