शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात कोरोना रूग्णांनी ओलांडला साडे चार हजारांचा टप्पा; शनिवारी २०५ नवीन रुग्णांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 21:02 IST

दिवसभरात ९२ रुग्ण घरी : तब्बल १७० रुग्ण अत्यवस्थ तर सात रूग्णांचा मृत्यू 

ठळक मुद्दे दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १७२३ नागरिकांची स्वाब तपासणीआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ४६३

पुणे : कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा शनिवारी २०५ ने वाढला असून शहरातील आकडा साडेचार हजाराच्या पलीकडे गेला आहे. एकूण रुग्णसंख्या ४ हजार ६०३ झाली आहे. बरे झालेल्या ९२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण १ हजार ८९२ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १७० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  शनिवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २०५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०७, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १६५ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १२८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी ०७ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २४८ झाली आहे. दिवसभरात एकूण ९२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ६७ रुग्ण, ससूनमधील ०१ तर खासगी रुग्णालयांमधील २४ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ४६३ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ८९२ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १७२३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४० हजार ४९३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १२२४, ससून रुग्णालयात १५६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५१२ रुग्ण उपचार घेत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलMayorमहापौरNavalkishor Ramनवलकिशोर राम