शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : इंदापूरमध्ये कोरोनाचा उद्रेक, एकाच दिवशी आढळले १३ नवीन रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 18:14 IST

इंदापूर शहरातील कोरोनाचा वाढता आलेख प्रशासन कसे रोखणार ? असा सवाल उभा राहिला आहे.

ठळक मुद्दे१३ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने इंदापूर तालुक्यात एकच खळबळ

इंदापूर : इंदापूर तालुक्यासह शहरात कोरोना महारोगाने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार अतिशय वेगाने होत असून गुरुवारी ( दि. २ ) एकाच दिवसात तब्बल १३ रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. यामध्ये इंदापूर शहरातील एकाच कुटुंबातील ५, तालुक्यातील शेळगाव येथील ५ व शेळगाव परिसरातील ३ असे एकूण १३ रुग्णांची एकाच दिवसात भर पडली आहे. बुधवार ( दि. १ ) जुलै रोजी इंदापूर शहरातील एका ५८ वर्षीय पुरुषाची आणि जंक्शन परिसरातील ३५ वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तर ( दि. ३० ) जून रोजी इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील एका ३२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीतुन उघड झाले. या सर्व रुग्णांच्या संपकार्तील तब्बल ३७ व्यक्तींच्या घशाचे नमुने ( स्वॅब ) घेण्यात आले. यापैकी एकूण १३ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने इंदापूर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.  

इंदापूर शहरातील एकाच कुटूंबांतील ५ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आहे. तर शेळगाव मधील ३२ वर्षीय रुग्णाच्या संपकार्तील ५ व्यक्ती कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे.  याशिवाय जंक्शन  येथील ३५ वर्षीय महिलेच्या संपकार्तील ३ व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा इंदापूर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दिवसोंदिवस इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. केवळ १२ दिवसात इंदापूर तालुक्यात एकूण १९ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने इंदापूरकरांची काळजी अधिक वाढली आहे. कोरोनाचा वाढता आलेख प्रशासन कसे रोखणार ? असा सवाल उभा राहिला आहे. तालुक्यात दिवसेंदिवस मुंबई, पुणे, सोलापूर या हॉटस्पॉटमधून नागरिकांची ये-जा सुरू असल्याने प्रशासनसमोर खूप मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

इंदापूर तालुक्याची एकंदरीत परिस्थिती :-- रुग्णांची एकूण संख्या - ३८- मृत्यूमुखी पडलेले  - २- बरे होऊन घरी सोडलेले  - १६- पुणे येथे उपचार सुरू असलेले  - ४- मुंबई येथे उपचार सुरू असलेले  - १- बारामती येथे उपचार  सुरू असलेले   - १- इंदापूर येथे उपचार सुरू असलेले  - १४-------------------------------

टॅग्स :IndapurइंदापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम