शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुण्याच्या अग्निशामक दलात कोरोनाचा शिरकाव; पन्नास वर्षीय जवानाला लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 16:16 IST

जवान रुग्णालयात दाखल : सोबतच्या जवानांची होणार तपासणी

ठळक मुद्देजवानावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू अन्य जवानांनी काळजी घेण्याचे तसेच सुरक्षा साधने वापरण्याचे आवाहन

पुणे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता लढत असलेल्या योद्ध्यांना त्याची लागण होऊ लागलेली आहे. पालिका-पोलीस कर्मचाऱ्यांनंतर अग्निशामक दलाच्या जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. अग्निशामक दलाच्या जवानाला लागण व्हायची ही पहिलीच घटना असून या जवानावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशामक दलाचा संबंधित कर्मचारी ५० वर्षांचा असून तो बंबावर चालक म्हणून काम करतो. पत्नी व मुलीसह दलाच्याच क्वॉर्टर्समध्ये राहण्यास आहे. या कर्मचाऱ्याला मागील आठवड्यात श्वास घेण्यात अडचण जाणवत होती. तसेच अंगदुखीचा त्रास जाणवू लागला होता. स्वतःची तपासणी करून घेत हा कर्मचारी सोमवारी दवाखान्यात दाखल झाला. त्याची स्वॅब टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. हा कर्मचारी अन्य कोणाच्या संपर्कात आला होता का याचा शोध घेण्यात येत आहे. यासोबतच त्याने ज्या शिफ्टला काम केले आहे, त्या शिफ्टमधील जवानांची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वर्दीला गाडी नेली होती त्या ठिकाणांचीही माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अग्निशामक दलात पहिला रुग्ण आढळून आल्याने आपत्कालीन व्यवस्थेतील आणखी एका यंत्रणेमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. अन्य जवानांनी काळजी घेण्याचे तसेच सुरक्षा साधने वापरण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस