शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : चिंताजनक ! पुण्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर ;  तर रुग्ण संख्या २०४ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 13:16 IST

पुणे शहरात गेल्या 12 तासांत 4 कोरोना बधितांचा मृत्यू

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. तर शहरात १६८ , पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे. पुणे शहरात गेल्या 12 तासांत 4 कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोरोनाबधितांच्या मृतांची संख्या गुरुवारी २० वर गेली असून, त्यातील एक जण बारामती येथील भाजी विक्रेता आहे. तर उर्वरित १९ कोरोना बधितांचा मृत्यू पुणे महापालिका हद्दीत झाला आहे. तसेच आज पुण्यातील एकूण कोरोनाबधितांच्या संख्येत दुपारी बारा वाजेपर्यंत २९ ने वाढ झाली असून हा आकडा आता २०४ वर गेला आहे. १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, पालिका विभाग, आरोग्य विभाग, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस यांच्याकडून विविध पावले उचलली जात आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना घराबाहेर न पडता सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात गेल्या तासांमध्ये कोरोनामुळे   मृत्यू होणाऱ्या व्यक्तींची संख्या २०  पोहचली आहे. कालपर्यंत हा आकडा १६ होता, मात्र, यात गुरुवारी ४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुणे शहरातील धोका निर्माण  झाला आहे. यामध्ये नायडू हॉस्पिटलमध्ये प्रथमच एका 44 वर्षीय कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याला डायबेटीसचा ही आजार होता. इतर चार जणांमध्ये 2 रुग्ण हे ससून रुग्णालयातील आहेत. यापैकी एका रुग्णाचे वय 71 तर एक रुग्णाचे वय 54 आहे. नोबेल हॉस्पिटलमधील एका रुग्णाचा मृत्यू कोरोना मुळे झाला असून, 67 वर्षीय हा रुग्ण डायबेटीसने ग्रस्त होता. गेल्या काही तासांत शहरात 4 जणांच्या कोरोनाबधितांच्या  मृत्यूमुळे पुण्यातील कोरोना बधितांच्या मृत्यूची संख्या एकूण २० झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू