शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

Corona Virus : दहा दिवसांत २२०० बेडचे ऑक्सिजन बेडमध्ये रुपांतर करा : विभागीय आयुक्त सौरभ राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 20:44 IST

येत्या ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात खासगी रुग्णालयांतील निम्मे बेड तरी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याच्या सूचना..

ठळक मुद्देमहिनाअखेरपर्यंत २ हजार ६६ ऑक्सिजन बेड, २५० व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासेल असा अंदाज

पुणे : सध्या शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या एकूण बेड पैकी ८० टक्के बेड खाजगी हाॅस्पिटलमध्ये असून, केवळ २० टक्केच सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भाग मिळून संपूर्ण जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये २ हजार २०० बेड असे आहेत, त्याठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध करता येणे शक्य आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत यातील निम्मे बेड तरी ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.मंगळवारी (दि.२२) झालेल्या पत्रकार परिषदेत राव बोलत होते. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात भेट देऊन कोरोनाचा आढावा घेतला. आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेटी दिल्या होत्या. त्यादरम्यान खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड तयार करण्याबाबत सूचना केल्या होत्या. यासंबंधी आदेश महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी काढणार आहेत.राव म्हणाले, या महिनाअखेर पर्यंत ऑक्सिजन बेडचे २ हजार ६६ तर २५० व्हेंटिलेटर्सची आवश्यकता भासेल असा अंदाज आहे. त्याबाबत बेड वाढवण्यासाठी जम्बो रुग्णालय, ससून, डॉ. डी. वाय.पाटील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. याशिवाय ऑक्सिजन विरहीत बेडची कमतरता भासणार नाही यासाठी शहरसह ग्रामीण भागात नियोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान, शासनाकडून जिल्ह्यात ३ लाख २३ हजार ५३९ कोरोना पॉझिटीव्ह असतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ही ६७ हजार ८९४ एवढी असण्याची शक्यता आहे. या अनुमानानुसार सध्या बेड उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.  -----कोरोना नियंत्रणासाठी व्यवस्थापन  आराखडा तयार केला जात आहे. सद्यस्थितीमध्ये ३१९१ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे  गेल्या आठवडाभरात ५८८ ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविण्यात आली तसेच आयसीयू चे ३३१ उपलब्ध झाले. आठवडाभरात त्यामध्ये ८१ निवड झाली आहे. ससून रुग्णालयातील बेडची क्षमता ३०० ने वाढविण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिली असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये ऑक्सीजन किंवा आयसीयू बेडची कमतरता नाही. रायगड आणि भरूच मधून ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने सद्यस्थितीत ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार रुग्णालयांकडून आलेली नसल्याचे असे आयुक्तांनी नमूद केले._

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याSaurabh Raoसौरभ रावhospitalहॉस्पिटलRajesh Topeराजेश टोपे