शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

Corona virus : पुण्यातील कोरोना बाधितांच्या 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' चा प्रशासनावर ‘स्ट्रेस’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 15:04 IST

दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या हजारच्या पुढे गेल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर मर्यादा..

पुणे : कोरोनाबाधित व्यक्तीमुळे इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलग करणे आवश्यक असते. शहरात संसर्ग सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी असल्याने प्रत्येक बाधिताच्या संपर्कातील सर्वांचा शोध घेतला जात होता. पण आता रुग्णांचा आकडा हजाराच्या पुढे गेल्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ला मर्यादा आल्या आहेत. बाधित व्यक्तीच्या घरातील व लक्षणे असलेल्या व्यक्तींच्या तपासणीवरच अधिक भर दिला जात आहे. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेले कुटूंबीय व कॅबचालक तसेच त्याच्या संपर्कात आलेल्या आरटीओमधील एका कर्मचाºयाचीही चाचणी घेण्यात आली होती. तेव्हापासून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढू लागल्याने संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचा ताणही वाढू लागला. आरोग्य विभागासह पोलिस यंत्रणेचीही मदत घेण्यात येत आहे. पण मागील काही दिवसांत रुग्णांचा आकडा हजाराच्या घरात जात असल्याने संपर्कातील प्रत्येक व्यक्तीचा शोध घेणे यंत्रणेला कठीण जात आहे. मनुष्यबळाअभावी यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. परिणामी सध्या कुटूंबातील व हाय रिस्क गटातील लोकांनाच शोधून तपासणी केली जात आहे. ----------------रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालल्याने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे यंत्रणेवरील ताण वाढला आहे. तरीही बाधित व्यक्तीचे कुटूंब, आजुबाजूचे तसेच त्याच्या थेट संपर्कातील व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. त्यातील लक्षणे असलेल्या व हाय रिस्क गटातील व्यक्तींची चाचणी केली जाते. इतरांना क्वारंटाईनच्या सुचना दिल्या जातात. - वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका-------------कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना प्रशासनाकडून प्रथम संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्येच सर्वाधिक बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १ लाख १४ हजार जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २४ हजार १२ जण बाधित आढळून आले असून एकुण बाधितांमध्ये हे प्रमाण ७८.६७ टक्के एवढे आहे. तसेच जनजागृतीमुळे स्वत: पुढे आलेल्या बाधित रुग्णांचे प्रमाण सुमारे १२ टक्के आहे. मोबाईल रुग्णावाहिकेतून ५ टक्के तर घरोघरी सर्वेक्षणातून सुमारे २ टक्के बाधित आढळून आले. -----------------असे होते ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ (स्त्रोत - पुणे महापालिका)                   एकुण तपासणी    बाधित                 टक्केवारीप्रथम संपर्क    १,१४,३९१        २४०१२                ७८.६७ मो.रुग्णवाहिका १२५३८           १५६७                  ५.१३ घरोघरी सर्वेक्षण ४८६४            ५६१                     १.८४ फ्लु क्लिनिक ६०९६               १४८                     ०.४८परदेश प्रवासी ५९५२               ३८                      ०.१२ पीएमपी कर्मचारी -                 २२६                    ०.७४अत्यावश्यक सेवा -                ३४८                    १.१४ स्वत: पुढे आलेले -                 ३६२३                  ११.८७-------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल