शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : चिंताजनक 'जम्बो' तुन 'आशेचा किरण' ; पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन पडला बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 20:18 IST

'जम्बो'तुन दोन रुग्ण व्हेंटिलेटरवरुन बाहेर

ठळक मुद्देरुग्णांना दिवसामधून पाच वेळा जेवण

पुणे : जम्बो कोविड सेंटरमधील कामकाज पुणे महापालिका प्रशासनाने ताब्यात घेतल्यानंतर सुधारणा दिसू लागल्या आहेत. रविवारी ऑक्सिजनवर असलेला कोरोनाचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला. तसेच व्हेंटिलेटरवर असलेल्या दोन रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना आयसीयूमधून बाहेर काढण्यात आल्याचे महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले. 

जम्बोमध्ये येत्या दोन-तीन दिवसात आणखी सुधारणा केल्या जाणार आहेत. यासोबतच रुग्णालयातील स्वच्छता विषयक कामांमध्येही विशेष लक्ष घालण्यात आले आहे. सर्व कामावर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येत असून कर्मचा-यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. लाईफलाईन या संस्थेकडून उपचारांमध्ये हलगर्जीपणा केल्यामुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नसल्याचे तसेच रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे आरोप झाले. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर टिकेची झोड उठली.त्यानंतर, जम्बोसाठी समन्वय समिती गठित करण्यात आली.महापालिकेने जम्बोची सर्व सुत्र ताब्यात घेतल्यानंतर ५० डॉक्टर्स आणि १२० वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ जम्बोमध्ये पुरविले. येथील व्यवस्थेतील त्रुटी सुधारुन रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत याकरिता प्रयत्न करण्यात येत असल्याचे अगरवाल म्हणाल्या.=====रुग्णांना पाचवेळा जेवणरुग्णांना वेळेवर जेवण मिळत नसल्याच्या तक्रारी मागील आठवड्याभरात आल्या. त्यामुळे पालिकेने आता जम्बो रुग्णालयामध्ये दिवसामधून पाच वेळा जेवण देण्यास सुरुवात केली आहे. हे जेवण दर्जेदार असावे आणि त्यामधून पोषणतत्व मिळावीत याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.=====बाऊन्सर्स हटविलेरुग्णांची माहिती घेण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईक तसेच माध्यमकर्मींना गेटवरच अडविले जात होते. जम्बोच्या प्रवेशद्वारावर नेमण्यात आलेले  ‘बाऊन्सर्स’ अरेरावी करत होते. मनसेच्या महिला अध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी तर गेटवरुन चढून जाऊन आंदोलन केले होते. यामध्ये महापालिकेने लक्ष घालत  सुरक्षारक्षक नेमले आहेत. बाऊन्सर्सला हटविण्यात आले आहेत.=====रुग्णांशी बोलता येणार व्हिडीओ कॉलवरुनरुग्णांसोबत बोलता येत नाही, त्यांची स्थिती कळत नाही अशा तक्रारी होत्या. रुग्णांची स्थिती नातेवाईकांना समजावी तसेच त्यांना थेट बोलता यावे याकरिता पालिकेने व्हिडीओ कॉलिंगची व्यवस्था केली आहे. त्याकरिता दोन टॅब खरेदी करण्यात आले आहेत. या टॅबवरुन व्हिडीओ कॉलिंगद्वारे थेट नातेवाईकांशी रुग्णांचा संवाद घडवून आणला जाणार आहे.====नातेवाईकांसाठी  ‘वेटिंग एरिया’रुग्णांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी प्रतिक्षा कक्ष व मदत कक्ष उभारण्यात आला असून त्यांना चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी दिवसातून तीनवेळा रुग्णांची माहिती दिली जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका