शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

Corona virus : बाजीगर..! पुण्यातील अंगणवाडी सेविकेने केली कोरोनावर मात....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 11:37 IST

चौदा दिवसांनंतर केल्या जाणाऱ्या तपासणीचे अहवाल सोमवारी आले निगेटिव्ह

ठळक मुद्देही महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर ग्रामीण भागात काळजीचे वातावरण निर्माण

पुणे : जिल्ह्यात अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या ४१ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली असून इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या आजाराला पराभूत केले आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले असून, पूर्णपणे बऱ्या झालेल्या या महिलेला बुधवारी घरी सोडण्यात येणार आहे. या महिलेचे वय आणि मूळ प्रकृती धडधाकट असणे यामुळे ती व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणा) असूनही ठणठणीत बरी झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.ही महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर ग्रामीण भागात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते.  दरम्यान, एका  हॉस्पिटलमध्ये या महिलेला दाखल करण्यात आले होते. या महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू केले होते. महापालिकेचा आरोग्य विभागही या रुग्णावर लक्ष ठेवून होता. चौदा दिवसांनंतर केल्या जाणाऱ्या तपासणीचे अहवाल सोमवारी निगेटिव्ह आले. त्यांची दुसरी तपासणी मंगळवारी करण्यात आली असून, त्याचे अहवाल येणे बाकी आहे.दरम्यान, संबंधित हॉस्पिटलचे अधिष्ठाता आणि त्यांच्या टीमला पालिका आयुक्तांनी बोलावून घेत उपचारांची आणि उपाययोजनांची माहिती घेतली. या महिलेची दुसरी चाचणीही निगेटिव्ह येईल, अशी आशा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.

...................................

रूग्णाला पोटावर झोपवून केले व्हेंटिलेशनकोरोनाबाधित महिलेला व्हेंटिलेटरवरून मंगळवारी सकाळी काढले आहे. जवळपास दहा दिवसांनंतर ती आयसीयूमधून बाहेर आली आहे. ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाच्या नियमावलीप्रमाणे उपचार देण्यास सुरुवात केली. महिलेला न्युमोनिया झाला होता. ही पहिलीच केस असल्याने थोडी भीती होती. पण आम्ही हे आव्हान स्वीकारले. न्युमोनियामुळे तिला पोटावर झोपवून व्हेंटिलेशन केले. सहसा रुग्णाला व्हेंटिलेशन करताना पाठीवर झोपविले जाते. महिलेला सहा तास सरळ, सहा तास पोटावर असे झोपविले जात होते. मग हळूहळू ती यातून बाहेर येत गेली. त्यामुळे दोन दिवसांपासून औषधे कमी करण्यास सुरुवात केली. सोमवारी ती हळूहळू बोलू लागली. आता ती कोरोनामधून बाहेर आली आहे. पण दहा दिवस व्हेंटिलेटरवर असल्याने शरीर कमजोर झाले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवावे लागणार आहे.- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय तज्ज्ञ

...............

पुण्यात नव्याने दोन रुग्ण; पिंपरीतील १0 झाले बरेपुण्यात मंगळवारी नव्याने दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. हे दोन्ही रुग्ण पुणे शहरातील आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच अनेक कडक निर्बंध देखील घातले आहेत. परंतु पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वाढ सुरूच आहे . पुण्यात आतापर्यंत १ हजार २३५ कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधील एका रूग्णाला घरी सोडण्यात आले. त्याची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे आता १२ रूग्णांपैकी १0 रूग्ण बरे झाले आहेत.  

टॅग्स :Puneपुणेbharti universityभारती विद्यापीठhospitalहॉस्पिटलCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdoctorडॉक्टर