शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

Corona Virus : येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र ५० बेडची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 10:22 PM

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना अधिक धोका असेल असा अंदाज टास्क फोर्सकडून वर्तविण्यात आला आहे.

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पालिकेने तयारीला सुरुवात केली असून खाटांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढले आहे. तिसऱ्या लाटेत जे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात मुलांसाठी स्वतंत्र ५० खाटांचे कोविड रुग्णालय तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता बालरोग तज्ज्ञांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा फटका सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त रुग्णांना बसला. तर, दुसर्‍या लाटेमध्ये तरुण वर्गावरही कोरोनाच्या घाला घातला. दुसऱ्या लाटेचा अंदाज बांधण्यात केंद्र, राज्य शासनापासून स्थानिक प्रशासनापर्यंत सर्वच यंत्रणा कमी पडल्या. त्यामुळे सध्या खाटांपासून ऑक्सीजन, व्हेंटीलेटर खाटा कमी पडू लागल्या. रेमडेसिविर व अन्य औषधांची मोठ्याप्रमाणावर चणचण भासू लागली.  त्यातच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसर्‍या लाटेमध्ये कोरोना विषाणूचे म्युटंट अधिक परिणामकारक राहील आणि याचा संसर्ग लहान मुलांमध्येही पसरण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.------  लहान बालकांपासून १० वर्षे वयाच्या मुलांच्या घशात असलेल्या थायमस ग्रंथीमुळे बर्‍यापैकी प्रतिकार शक्ती असते. परंतू १८ वर्षाखालील प्रामुख्याने १० ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाशी लढा देणारी प्रतिकार शक्ती वाढविण्यासंदर्भात अद्याप लस किंवा औषध नाही. या गटातील मुलांना संसर्ग झाल्यास विदारक स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -----पालिकेने पहिल्या दिवसापासून कोरोनाविरोधात लढा दिला आहे. आरोग्य सुविधा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तिसर्‍या संभाव्य लाटेचा विचार करून तसेच तज्ज्ञांची मते घेऊन लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र ५० खाटांचे रुग्णालय तयार करण्यात येणार आहे. - रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका-----१. मुलांचे पालकही बाधित असतील, तर त्यांच्यावरही याच ठिकाणी उपचार करणार.२. पालिकेकडे सध्या ९ बालरोग तज्ञ आहेत. आणखी ९ बालरोग तज्ञ नेमण्याची कार्यवाही सुरू.३. पालिकेने यापुर्वी कोरोनाबाधित महिलांच्या प्रसुतिसाठी सोनावणे हॉस्पीटलमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली.-----कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना अधिक धोका असेल असा अंदाज टास्क फोर्सकडून वर्तविण्यात आला आहे. हे लक्षात घेऊन येरवडा राजीव गांधी रुग्णालयात कोरोना बाधित लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र ५९ बेडची व्यवस्था करावी यासाठी आमदार निधी दिला आहे. भविष्यात राजीव गांधी रुग्णालय हे सर्व सुविधा युक्त मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय करण्यात येईल.- सुनील टिंगरे, आमदार, वडगाव शेरी

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका