शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पिंपरीत एकाच दिवशी तब्बल ५ हजार ५८१ जण कोरोनामुक्त; अचानक संख्या वाढण्यामागे ' हे 'आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 20:40 IST

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२,२८४ इतकी झाली.

ठळक मुद्देगुरुवारी दिवसभरात 977 रुग्णसंख्यानोंद न झाल्याने कोरोनामुक्त रुग्णसंख्येत अचानक झाली वाढ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा वाढत असून, गुरुवारी दिवसभरात ९७७ जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२,२८४ झाली. महापालिका हद्दीबाहेरील ४४ नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र कोरोनामुक्त रुग्णांच्या नोंदीबाबत प्रशासनाचा भोंगळ कारभार गुरुवारी समोर आला. वेळोवेळी नोंद न झाल्याने कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अचानक वाढून ५५८१ झाली. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या संगणकीय यंत्रणेत रुग्ण संख्या अद्ययावत करण्याबाबत गोंधळ होत असल्याचे यावरून स्पष्ट झाले. डाटा एन्ट्री करायची राहिलेल्या रुग्णांची माहिती गुरुवारी अद्ययावत करण्यात आली. शहरात गुरुवारी दिवसभरात ४१९८ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. २४६५ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. दिवसभरात २० रुग्ण दगावले असून, त्यात महापालिका हद्दीबाहेरील आठ जणांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत ८९१ तर महापालिका हद्दीबाहेरील २०२ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. २९८० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून ८८०२ जणांना घरी सोडण्यात आले. ५७२५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. महापालिका हद्दीबाहेरील १०३१ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर महापालिका हद्दीबाहेरील २०७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ४१७०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह २८३ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसshravan hardikarश्रावण हर्डिकरMayorमहापौर