शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : पुणे शहरात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबधित रुग्णांपैकी ३६ रुग्ण गंभीर स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 21:50 IST

३६ पैकी २३ रुग्ण ससून रुग्णालयात असून त्यात ९ जणांना व्हेंटिलेटरवर...

ठळक मुद्देशहरात गुरुवारी नवीन १०४ रुग्ण आढळून आल्याने एकूण बधितांचा आकडा 876 वर गंभीर रुग्णांचा आकडाही वाढल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर

पुणे : शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबधित रुग्णांपैकी ३६ जण गंभीर स्थितीत आहेत. त्यातील २३ रुग्ण ससून रुग्णालयात असून त्यापैकी ९ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ससून मधील उर्वरित १४ जणांना व्हेंटिलेटरची गरज नसली तरी त्यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, गुरूवारी (दि. २३) शहरात तीन जणांचा मृत्यू झाला असून १६ जणांना घरी सोडण्यात आले.शहरात गुरुवारी नवीन १०४ रुग्ण आढळून आल्याने एकूण बधितांचा आकडा 876 वर पोहचला.  पहिल्यांदाच एका दिवसात नवीन रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. तसेच गंभीर रुग्णांचा आकडाही वाढल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी ससून सह विविध रुग्णालयांमध्ये ३६ रुग्णांची प्रकृती गंभीर होती. दिवसभरात तिघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत्यू ६० झाले आहेत. ससून रुग्णालयात मंगळवारी रात्री व गुरूवारी दोन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४८ वर पोहचला. बुधवारी रात्री मृत्यू झालेल्या गंजपेठेतील ५० वर्षी महिलेला लठ्ठपणाचा आजार होता. तिला १९ एप्रिलपासून लक्षणे असताना ती २१ एप्रिलला गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल झाली. त्यामुळे त्याच रात्री तिचा मृत्यू झाला. तिचा तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. तर गुरूवारी पर्वती दर्शन येथील ४१ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. त्याला २२ एप्रिलला दाखल करण्यात आले होते. कासेवाडी येथील 83 वर्षीय व्यक्ती व येरवडा येथील 56 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. दरम्यान, ससून रुग्णालयामध्ये गुरूवारी नव्याने १५ कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाल्याने एकुण रुग्णसंख्या १२९ वर पोहचली आहे. तर सध्या ७५ संशयित रुग्ण आहेत. बाधित रुग्णांपैकी ४१ रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब किंवा अन्य आजार आहेत. एकुण रुग्णांपैकी २३ जणांची प्रकृती गंभीर असून ९ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलsasoon hospitalससून हॉस्पिटलMedicalवैद्यकीय