शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत तब्बल ३५८ नवीन रूग्ण, कोरोनाबाधितांची संख्या ५ हजार १६७

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 23:06 IST

आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 167 एवढी

ठळक मुद्देदिवसभरात 358 नवीन रुग्णांची भर तर 15 बळीशहरात १६८ कोरोनाबाधित कोरोनामुक्तसद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये १ हजार ७८६ कोरोनाबाधित रूग्ण घेत आहे उपचारकोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही पुणे शहरात देशाच्या व राज्याच्या तुलनेत अधिक

पुणे : शहरी भागाबरोबरच आता ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा विळाखा आणखी घट्ट होताना दिसत असून, शुक्रवारी एका दिवसांत तब्बल ३५८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर १५ व्यक्तींचा मृत्यु झाला. यामुळे आता एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ हजार १६७ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोना संशयित रूग्णांच्या तपासण्याचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे.---- शहरातील आजपर्यंतची सर्वाधिक वाढ : तब्बल २९१ कोरोनाबाधित रूग्ण..

शहरातील कंटन्मेंट झोनमधील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याची मोहिमच महापालिकेने हाती घेतली असून, दररोज दीड ते पावणे दोन हजार नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. परिणामी सौम्य लक्षणे असलेले रूग्णही अधिकाधिक प्रमाण उजेडात येऊ लागले असून, शुक्रवारी दिवसभरात प्राप्त झालेल्या तपासणी अहवालापैकी, तब्बल २९१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. पुणे शहरात एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.     दुसरीकडे शहरातील कोरोनाबाधितांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले असून, आज एकाच दिवसात सर्वाधिक म्हणजे १६८ रूग्ण कोरोनामुक्तही घरी परतले आहेत. यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या ही आता २ हजार ३७१ इतकी झाली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही पुणे शहरात देशाच्या व राज्याच्या तुलनेत अधिक असून, ही टक्केवारी निम्म्याहून अधिक म्हणजे ५३़९० टक्के इतकी आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र मात्र अद्यापही कायम असून, देशाच्या व राज्याच्या तुलनेत हा दर पुणे शहरात जास्त आहे़ परंतु़, शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या व कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण, उपचार घेणाºयांची संख्या यांची तुलना करता मृत्यूचे प्रमाण हे तुलनेने कमीच आहे़    पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात सर्वाधिक म्हणजेच १ हजार ७३५ कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी २९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यापैकी महापालिकेच्या नायडू व आयसोलेशन सेंटरमध्ये २४७, ससून हॉस्पिटलमध्ये ९ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ३५ जणांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.    सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये १ हजार ७८६ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असून, यापैकी १६८ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे़ तर ४९ जण व्हेंटिलेटरवर आहे.

एकूण बाधित रूग्ण : 5167पुणे शहर : 4471पिंपरी चिंचवड : 253कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 443मृत्यु : 257 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलNavalkishor Ramनवलकिशोर राम