शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

Corona virus : पुणे शहरात शनिवारी २५४ तर पिंपरीत २६७ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 20:42 IST

पुणे शहरात दिवसभरात ३१७ कोरोनाबाधितांची वाढ : ६ रुग्णांचा मृत्यू 

पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये शनिवारी दिवसभरात ३१७ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात बरे झालेल्या २५४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार १५० झाली आहे.    

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २२८ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १५५ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ८०३ रुग्ण आॅक्सिजनवर आहेत. दिवसभरात ६ मृतांची नोंद करण्यात आली आहे.  कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४ हजार ५३६ झाली आहे. पुण्याबाहेरील ३ मृत्यूची नोंद करण्यात आली. 

दिवसभरात एकूण २५४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ३३ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या १ लाख ७३ हजार ७१९ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ५ हजार १५० झाली आहे.   -------------   दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ७७१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८ लाख ६० हजार ३६६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

.............

पिंपरीत १६० जण नवे कोरोना रुग्णपिंपरी : कोरोनाचा विळखा सैल होताना दिसत असून दिवसभरात १६० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर २६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात आज एकही कोरोनाचा बळी गेला नाही.

 पिंपरी-चिंचवड शहरात विविध रुग्णालयात ३ हजार ०३८ जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ६३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १०६४ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दिवसभरात ३ हजार १२३ जणांना डिस्चार्ज  दिला आहे. तर दाखल रुग्णांची संख्या ७९७ वर पोहोचली आहे...............................कोरोनामुक्त वाढलेमागील आठवड्यात शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची वाढू लागली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा दीडपटीने रुग्ण कोरानामुक्त होत  आहे. परिसरातील २६७ जण कोरोनामुक्त झाले. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९१ हजार ०३२ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४ हजार २६८ वर पोहोचली आहे. मृत होणाऱ्यांची संख्या १ हजार ७१६ वर पोहोचली आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका