शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

Corona virus : दौंड येथे राज्य राखीव दलाच्या कोरोनाबाधित जवानांची संख्या २४ वर ; मुंबईला गेले होते बंदोबस्तासाठी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 22:28 IST

राज्य राखीव पोलीस दलाचे ९५ जवान मुंबई येथे बंदोबस्त करुन येथील नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात परतले होते.

ठळक मुद्देदौंड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २५  

दौंड : मुंबई येथे बंदोबस्त करुन पुन्हा नानवीज (ता.) दौंड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आलेल्या राज्य राखीव पोलीस दलाचे १५ जवान कोरोनाबाधित असल्याची माहिती उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली़ आहे. दरम्यान, यापूर्वी ९ जवान बाधित होते. त्यामुळे आता कोरोनाबाधित जवानांची संख्या २४ झाली असून दहिटणे येथील एक जण यापूर्वीच कोरोनाबधित असून तालुक्यात रुग्णांची संख्या २५ झाली आहे. राज्य राखीव पोलीस दलाचे ९५ जवान मुंबई येथे बंदोबस्त करुन येथील नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात परतले होते. त्या सर्वांना क्वारंटाइन करत त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. त्यातील १५ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले.शहरात राज्य राखीव पोलीस बलाचे ९ जवान पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचे उपाय म्हणून उर्वरीत जवानांना दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ७ च्या अष्टविनायक मंगल कार्यालयात क्वारंटाइन करुन ठेवण्यात आले आहे. हे सर्व जवान गेल्या पंधरा दिवसापूर्वी मुंबई येथून बंदोबस्त करुन आले होते. दरम्यान गेल्या दोन दिवसांपूर्वी गट क्र. ७ ची बधुवार (दि. ६ ) रोजी सायंकाळी ९५ जवानांची तुकडी मुंबई येथून बंदोबस्त करुन आले होते.  या सर्व जवानांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही राष्टीय विषाणूजन्य संशोधन संस्थेत (एनआयव्ही)जवानांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यातील १५ जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत . एकंदरितच  तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २५  झाल्याने शासनाकडून खबरदारीचे योग्य ते ऊपाय सुरु करण्यात आले आहेत .परिणामी गट क्र..पाच आणि सातच्या परिसरात जवानांचे कुटुंब आणि एसआरपीच्या शासकिय कार्यालयाच्या परिसरात धुराळणी फवारणी सुरु करण्यात आले असल्याचे एसआरपीचे वैद्यकीय अधिक्षक  डॉ. वैशाली खान , डॉ. नितीन भोसले यांनी सांगितले. तसेच नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाइन केलेले जवान आहे तर पॉझिटिव्ह आलेले १५ जवान पुण्याला पाठविण्यात येणार असल्याचे समजते. तेव्हा नानवीज प्रशिक्षण केंद्र दौंड शहरापासून पाच किलो मीटर अंतरावर आहे. तेव्हा शहरातील लॉकडाऊनची परिस्थिती सध्या आहे तशीच राहणार असल्याचे मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी सांगितले. परिणामी किराणा , दुध , दवाखाने , मेडिकल दूकाने ,रेशन दुकानें, वृत्तपञ विक्री सुरु राहणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस