पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत गुरूवारी १ हजार ६९९ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ५३ हजार ४३७ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १३१५ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ९२७ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १८ हजार २१५ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९२७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४७१ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ४५६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ६९३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ३० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १२८४ झाली आहे. दिवसभरात एकूण १३१५ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३३ हजार ९३८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १८ हजार २१५ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार २४१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २ लाख ६७ हजार २४१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus : पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात १६९९ कोरोनाबाधित; १३१५ रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 22:31 IST
तब्बल ९२७ अत्यवस्थ, ३० जणांचा मृत्यू
Corona virus : पुणे शहरात गुरुवारी दिवसभरात १६९९ कोरोनाबाधित; १३१५ रुग्ण झाले बरे
ठळक मुद्देआतापर्यंत २ लाख ६७ हजार २४१ रूग्णांची तपासणी सक्रिय रुग्णांची संख्या १८ हजार २१५ आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३३ हजार ९३८