शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

Corona virus : पुणे जिल्ह्यात १६०० खाटांना मिळणार 'ऑक्सिजन'; सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 23:10 IST

सध्या केवळ ५० खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय

ठळक मुद्देराज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांचीबारामती, इंदापुर, मंचर, दौंड व भोर या पाच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकुण ४०० खाटा१९ ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ३० याप्रमाणे ५७० खाटासर्व रुग्णालयातील प्रत्येक खाटेपर्यंत पाईपद्वारे ऑक्सिजन पोहचविला जाणार

राजानंद मोरे-पुणे : औंध येथील जिल्हा रुग्णालयातील सर्व ३०० खाटांसह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयातील सुमारे १६०० खाटांना ' ऑक्सिजन ' मिळणार आहे. सर्व रुग्णालयातील प्रत्येक खाटेपर्यंत पाईपद्वारे ऑक्सिजन पोहचविला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही दिवसांपुर्वी सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला असून काही ठिकाणे कामेही सुरू झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ऑक्सिजनची भासणाऱ्या रुग्णांना उपजिल्हा किंवा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयाची क्षमता ३०० खाटांची असते. औंध येथील रुग्णालयामध्येही ३०० खाटा आहेत. मात्र सध्या केवळ ५० खाटांना ऑक्सिजन पुरवठ्याची सोय आहे. त्यामध्ये एकुण १६ अतिदक्षता विभागातील बेड आहेत. त्यासाठी दोन ठिकाणी ऑक्सिजनचे जम्बो सिलिंडर लावावे लागतात. दररोज किमान १०० जम्बो सिलेंडर लागतात. एका सिलेंडरची क्षमता सुमारे ४६ लिटरची असते. त्यामुळे प्रशासनाकडून सकाळी ५० व सायंकाळी ५० असे १०० सिलेंडर कंपनीकडून भरून आणले जातात. त्यामध्ये खंड पडल्यास रुग्णांच्या जीवावर बेतु शकते. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात एकाच ठिकाणी सुमारे ६ हजार लिटर क्षमतेची टाकी उभारली जात आहे. तिथून सर्व खाटांसाठी पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा होईल. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही.जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच बारामती, इंदापुर, मंचर, दौंड व भोर या पाच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये एकुण ४०० खाटा आहेत. तर एकुण १९ ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ३० याप्रमाणे ५७० खाटा आहेत. सध्या या रुग्णालयांमध्ये गरजेनुसार ऑक्सिजन सिलिंडरचा वापर केला जातो. पण कोरोनामुळे ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या ग्रामीण भागातही वाढू लागली आहे. त्याचा ताण पुणे शहरावर येऊ लागला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील सर्व खाटांना पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आवश्यक कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात ऑक्सिजन खाटांची उपलब्धता वाढणार आहे. बारामती येईल महिला रुग्णालयामध्ये ही व्यवस्था केली जाणार आहे.--------कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर औंध जिल्हा रुग्णालयासह ५ उपजिल्हा व १९ ग्रामीण रुग्णालयांमध्ये पाईपद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्याची यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे केली जात आहेत. त्यांना औंध येथील काम पुढील १५ दिवसांत पुर्ण करण्याची विनंती केली आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातही पुरेशा ऑक्सिजन खाटा उपलब्ध होणार आहेत.- डॉ. अशोक नांदापुरकरजिल्हा शल्यचिकित्सक-----------------------पाईपद्वारे आॅक्सिजन पुरवठा होणाºया खाटाऔंध जिल्हा रुग्णालय - ३००उपजिल्हा रुग्णालये - बारामती - १००इंदापुर - १००मंचर - १००दौंड - ५०भोर - ५०ग्रामीण रुग्णालये - १९ - प्रत्येकी ३० खाटा------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरNavalkishor Ramनवलकिशोर राम