शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामतीत सापडला १५ वा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; लोणी भापकर गाव सील  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 11:32 IST

श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याची कोरोना ची तपासणी

ठळक मुद्देबाहेरून आलेल्या नागरिकामुळे बारामतीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र ग्रामीण भागात कोरोना पसरत असल्याने स्थानिक नागरिक अडचणीत

बारामती : बारामतीत १५वा कोरोना चा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे.हा रुग्ण ७० वर्षीय असून तो मुंबई घाटकोपर येथून १९ मे रोजी गावी आला होता .प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत माहिती दिली. त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. हा रुग्ण १९ मे रोजी त्याच्या घरी आला होता. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याची कोरोनाची तपासणी करण्यात आली .त्यामध्ये त्याला संसर्ग झाल्याचे आज मिळालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.बारामती च्या ग्रामीण भागातील हा ७ वा  कोरोना बाधित  रुग्ण आहे. बारामतीत एकुण संख्या आता १५वर जाउन पोहचली आहे.आजचा रुग्ण देखील मुंबईतून आला आहे .बारामती शहर कोरोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश आले.मात्र, बाहेरून आलेल्या नागरिकामुळे बारामतीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे, तसेच ग्रामीण भागात कोरोना पसरत असल्याने स्थानिक नागरिक अडचणीत आल्याचे दिसत आहे .नागरीकांनी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे  देखील महत्वाचे  आहे .लोणी भापकर गाव पूर्ण सील करण्यात आले आहे. आसपासचे तीन किमी क्षेत्र बफर झोन घोषित करण्यात आला आहे .शहरात कल्याणीनगर  श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत , कल्याणीनगर परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ,मुर्टी,वडगांव निंबाळकर  येथे आजपर्यंत रुग्ण आढळले आहेत .कट्फळ  येथील रुग्णावर मुंबईत, तर माळेगाव,मुर्टी,वडगांव निंबाळकर, कल्याणीनगर येथील रुग्णावर देखील  बारामती येथे उपचार सुरू आहेत. पुणे मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतच आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर