तुळापूर येथे कोरोना ग्रामस्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST2021-07-18T04:08:27+5:302021-07-18T04:08:27+5:30

लोणीकंद : श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत तुळापूर व ...

Corona Village Cleanup Campaign at Tulapur | तुळापूर येथे कोरोना ग्रामस्वच्छता अभियान

तुळापूर येथे कोरोना ग्रामस्वच्छता अभियान

लोणीकंद : श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे कोरोना पार्श्वभूमीवर ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत तुळापूर व समस्त ग्रामस्थ तुळापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, शौर्यपीठ तुळापूर, भीमा नदीकाठ येथे स्वच्छता केला.

तसेच त्रिवेणी संगमावरील परिसर, घाट, संगमेश्वर मंदिर, समाधिस्थळाशेजारील परिसर आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. श्रीनाथ डेव्हलपर्स प्रा. लि. साहित्य साधन सामग्री व सर्व सहकार्य केले. ‘स्वच्छता हीच सेवा’ माणून ग्रामस्थ व तरुणानी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

त्या अंतर्गत तुळापूर गावात ग्रामस्वच्छता कार्यक्रमास सकाळी ७ वाजता सुरुवात करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. प्लॅस्टिक कचरा बाटल्या, शौचालय, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. संपूर्ण परिसर साफसफाई करून चकाचक करण्यात आला. दहा ट्राली कचरा गोळा करून नष्ट केला. या मोहिमेमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, कर्मचारी आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, तरुण मंडळाचे कार्यकर्ते आदींनी सहभाग घेतला.

तुळापूर (ता. हवेली) ग्रामस्वच्छता कार्यक्रमामध्ये सहभागी ग्रामस्थ व तरुण.

Web Title: Corona Village Cleanup Campaign at Tulapur