शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Corona vaccine: कोविशिल्डचा प्रभाव दहा आठवड्यांपुरताच? तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 10:26 IST

Corona vaccine Update: कोविशिल्ड आणि फायझर लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर, १० आठवड्यांनी प्रतिपिंडांचे (अँटिबॉडीजचे) प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाल्याचा अभ्यास अहवाल ‘लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिध्द झाला आहे.

पुणे : कोविशिल्ड आणि फायझर लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर, १० आठवड्यांनी प्रतिपिंडांचे (अँटिबॉडीजचे) प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाल्याचा अभ्यास अहवाल ‘लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिध्द झाला आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. प्रतिपिंडांचे प्रमाण कमी झाले, तरी विषाणूबाबतची स्मरणशक्ती ‘टी-सेल्स’ नावाच्या पेशींमध्ये तयार होते. त्यामुळे भविष्यात विषाणूने हल्ला केला, तरी या पेशी नवीन प्रतिपिंडे निर्माण करतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या स्वयंसेवकांची संख्या, वयोगट, आहार, रोगप्रतिकारकशक्ती, सहव्याधी हे मुद्देही विचारात घ्यावे लागतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात कोविशिल्ड लसीचे डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त आहे. त्यामुळे अहवालात नमूद करण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, लस घेतल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी प्रतिपिंडांचे प्रमाण कमी झाले, तर विषाणूविरोधात मिळणारे संरक्षण कमी होईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

अधिक अभ्यास हवाअ‍ॅस्ट्राझेनेका आणि फायझर या दोन्ही नामांकित कंपन्या आहेत. लसीला आपत्कालीन परवानगी देताना कंपन्यांनी बऱ्याच निकषांवर अभ्यास केलेला असतो. कोट्यवधी लोकसंख्येपैकी ६०० ‘सॅम्पल साईज’ ही खूप छोटी संख्या आहे. त्यावरून अंदाज बांधता येऊ शकतो, अंतिम निष्कर्ष काढता येऊ शकत नाही. त्यामुळे अहवालाबाबत अधिक अभ्यास गरजेचा आहे.- डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियापेशींची स्मरणशक्ती मरेपर्यंतप्रतिकारशक्तीमध्ये ६ ते ७ प्रकारच्या पेशी तयार होतात. त्यामध्ये काही पेशी अँटिबॉडी तयार करतात, काही स्मरणशक्ती साठवून ठेवतात, तर काही विषाणूवर थेट हल्ला करतात. टी-सेल्समध्ये विषाणूविरोधात स्मरणशक्ती तयार झालेली असते. आपण जिवंत असेपर्यंत या पेशी कार्यरत असतात. त्यामुळे दोन डोस घेतलेल्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य