गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले ८९ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:52+5:302021-02-05T05:17:52+5:30
पुणे : गुरूवारी दिवसभरात शहरातील १३ रुग्णालयांमधील १६ केंद्रांवर १ हजार ४३१ आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली़ ...

गुरुवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले ८९ टक्के
पुणे : गुरूवारी दिवसभरात शहरातील १३ रुग्णालयांमधील १६ केंद्रांवर १ हजार ४३१ आरोग्य सेवकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली़ बुधवारच्या तुलनेत ६ टक्क्यांनी यात वाढ झाली असून, काही रूग्णालयांमध्ये १३३ टक्क्यांपर्यंतही लसीकरण झाले आहे़
पुणे महापालिकेकडे नोंद केलेल्या हजारो आरोग्य सेवकांपैकी अनेकांना कोरोना होऊन गेल्याने, कोरोना आजारातून मुक्त झालेल्या दिवसापासून दोन महिन्यानंतरच ही लस घेता येते़ तसेच अनेक आरोग्य सेवकांचे नाव हे ज्या दिवशी को-विन अॅपमध्ये येते, त्या आदल्या दिवशी त्यांना त्याबाबतच एसएसएम अगर तत्सम माहिती वेळेत पोहचत नाही़ त्यामुळे नाईट ड्युटी करणाºया काही आरोग्य सेवकांनाही आत्तापर्यंत नोंदणीच्या दिवशी किंबहुना ज्या दिवशी त्यांचे नाव आहे त्यादिवशी लस घेता येत नव्हती़
गत आठवड्यापर्यंत येणाºया अशा अडचणींवर आता मात करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असून, यामुळे गेल्या तीन दिवसांपासून लसीकरणाची टक्केवारी वाढली आहे़
====
रुग्णालय उद्दिष्ट लसीकरण
जयाबाई सुतार दवाखाना १०० ६१
कमला नेहरु रुग्णालय १०० १०७
केईएम रूग्णालय १०० ९८
ससून रुग्णालय १०० ६०
बी. जे. मेडीकल १०० ७०
राजीव गांधी रुग्णालय १०० ६७
जोशी रूग्णालय १०० ५५
रुबी हॉल क्लिनिक १०० १००
इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटल १०० १००
जहांगिर रुग्णालय १०० ८१
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (दोन केंद्र)२०० २४५
नोबल हॉस्पिटल (दोन केंद्र) २०० १४१
भारती हॉस्पिटल (दोन केंद्र) २०० २४६
-----------------------------------------