शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Corona Vaccination : कोरोना लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 16:50 IST

प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटिबध्द आहे.

पुणे : राज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज आहे. परदेशातून लस खरेदी करण्याचीही शासनाची तयारी आहे. लस उत्पादक 'भारत बायोटेक'च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिथे लवकरच लसीचं उत्पादन सुरू होईल. या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगानं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते हडपसर येथे पहिल्या 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन' सेंटरचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे. हडपसरमधील ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा मला विश्वास आहे. कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटिबध्द आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे सामना करत आहोत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत कोणत्याही परिस्थितीत बेसावध राहून चालणार नाही. राज्य शासनानं तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकजुटीनं कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन करा असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAjit Pawarअजित पवार