शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

Corona Test at Home: घरच्या घरी CoviSelf kit ने चाचणी कशी करायची? कोणते अ‍ॅप वापरायचे; कधी येणार, माहिती जाहीर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 14:13 IST

ICMR approves home-based RAT kit CoviSelf for Covid testing: CoviSelf home Corona test kit ची किंमत वाजवी असली तरीदेखील ते वापरण्यासाठी काही अटी आणि नियम घालून देण्यात आले आहेत. महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे हे टेस्ट किट केव्हापासून आणि कुठे कुठे उपलब्ध होणार आहे. कोणते अॅप वापरणार जाणून घ्या...

corona testing at home: घरच्या घरी कोरोना चाचणी करण्यासाठी ICMR ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशातील पहिल्या कोरोना किटला (Rapid Antigen Kits) परवानगी दिली आहे. याचा फायदा कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच कोरोना चाचणी केंद्रांवर होणारी गर्दी तसेच चाचणीसाठी होणारी टाळाटाळ थांबविण्यासदेखील होणार आहे. या होम टेस्ट किटचे नाव CoviSelf असे असून त्याची किंमत 250 रुपये आहे. (Pune's Mylab receives ICMR approval for India's first self-use Rapid Antigen Test kit 'CoviSelf' for COVID-19.)

Black Fungus: ब्लॅक फंगसचा धोका कसा ओळखावा? ही आहेत लक्षणे, उपाय; AIIMS कडून नव्या गाईडलाईन जारी

CoviSelf home Corona test kit ची किंमत वाजवी असली तरीदेखील ते वापरण्यासाठी काही अटी आणि नियम घालून देण्यात आले आहेत. हे टेस्ट किट घेतल्यानंतर तुम्हाला एक गुगल प्ले स्टोअरवरून किंवा अ‍ॅपल स्टोअरवरून एक अ‍ॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अ‍ॅपचे नाव MyLab Coviself App असे आहे. याची माहिती तुम्हाला कोव्हिसेल्फ टेस्ट किटवर देखील मिळणार आहे. (To use self-use Rapid Antigen Test kit 'CoviSelf' you have to download MyLab Coviself App.)

कधी उपलब्ध होणार?Rapid Antigen Kits to conduct Covid test at home:आता महत्वाचा प्रश्न उरतो तो म्हणजे हे टेस्ट किट केव्हापासून आणि कुठे कुठे उपलब्ध होणार आहे. याची माहिती CoviSelf उत्पादक कंपनी Mylab Discovery Solutions चे संचालक सुजित जैन यांनी दिली आहे. CoviSelf द्वारे चाचणी घेण्यासाठी केवळ दोन मिनिटे लागणार आहेत. तसेच हे किट 15 मिनिटांत रिझल्ट देणार आहे. CoviSelf किट हे पुढील आठवड्याच्या अखेरीस बाजारात उपलब्ध होणार आहे. जवळपास 7 लाखांहून अधिक मेडिकलमध्ये ते उपलब्ध केले जाणार आहे. तसेच कंपनीच्या ऑनलाईन पार्टनर म्हणजेच ऑनलाईन औषधे विकणाऱ्या कंपन्यांकडे देखील हे किट उपलब्ध केले जाणार आहे. देशातील जवळपास 90 टक्के पिन कोडवर हे किट कसे पोहोचेल हे पाहिले जाणार असल्याचे जैन यांनी सांगितले. 

महत्वाचे म्हणजे ही कंपनी पुण्याची आहे. ICMR ने या किटला परवानगी देताना काही नियम अटी घातल्या आहेत. याची माहिती खाली दिलेल्या लिंकवर मिळणार आहे. (ICMR issued detailed guidelines on who can use it and how.)

Corona Test at Home: मोठा दिलासा! आता घरबसल्या स्वत:च करा कोरोना चाचणी; टेस्ट किटला परवानगी, जाणून घ्या किंमत...

या किटद्वारे स्वत:च स्वत:ची चाचणी करता येणार आहे. जर या किटवर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आलात तर पुन्हा RT-PCR चाचणी करण्याची गरज नाही, असे आयसीएमआरने म्हटले आहे. कोणीही हे किट कसे वापरावे हे वाचून किंवा व्हिडीओ पाहून कोरोना चाचणी करू शकणार आहे, असे जैन म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या