बारामतीत ‘अनलॉक’नंतर रस्त्यावर नागरिकांची कोरोना तपासणी; पोलीस प्रशासनाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 06:29 PM2021-06-10T18:29:11+5:302021-06-10T18:30:01+5:30

पोलीस प्रशासनाचा पुढाकार सर्वांचेच अहवाल मिळाले ‘निगेटिव्ह’

Corona test of citizens on the road after ‘unlock’ in Baramati | बारामतीत ‘अनलॉक’नंतर रस्त्यावर नागरिकांची कोरोना तपासणी; पोलीस प्रशासनाचा पुढाकार

बारामतीत ‘अनलॉक’नंतर रस्त्यावर नागरिकांची कोरोना तपासणी; पोलीस प्रशासनाचा पुढाकार

Next

बारामती : मंगळवार (दि. ८) पासून बारामतीचा ‘अनलॉक’च्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांना त्यांची दुकाने ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या मदतीने गुरुवारी (दि. १० ) घराबाहेर पडलेल्या नागरिकांची अचानक तपासणी केली. यावेळी १८० जणांच्या अँटिजेन कोविड तपासण्या करण्यात आल्या. सुदैवाने सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवरक यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार वैद्यकीय विभागाच्या मदतीने गुरुवारपासून बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सम्यक चौक,इंदापूर चौक याठिकाणी तपासण्या  करण्यात आल्या. सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्याचे शिरगांवकर यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी(दि ९) बारामती तालुक्यातील मेखळी, माळवाडी (काऱ्हाटी) व खराडेवाडी येथे अँंटिजेन तपासणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये एकूण २४३ संशयितांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण २० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बारामतीतील एकूण रुग्ण संख्या २४ हजार ८३६ झालेली आहे.तसेच गेल्या २४ तासात एकूण आरीटीपीसीआर १८८ नमुने तपासण्यात आले. यामध्ये बारामतीमधील पॉझिटिव्ह-२८ आले आहे. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२ आहेत. म्युकर मायकोसिसचे एकूण रुग्ण- २२ पैकी बारामती तालुक्यातील- १५ इतर तालुक्यातील- ७ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान काल दिवसभरातील रुग्णसंख्या ३७+ २० = ५७ झाली आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली.

ज्या नागरिकांचा दुसरा डोस (कोविशिल्ड) प्रलंबित आहे व पहिला डोस झाल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत. ज्या नागरिकांचा (कोव्हॅक्सिन) या लसीचा दुसरा डोस (२८दिवस पूर्ण) प्रलंबित आहे. अशाच नागरिकांसाठी महिला हॉस्पिटल बारामती व तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे  या ठिकाणी लसीकरण सुरू असल्याचे डॉ.खोमणे यांनी सांगितले.
—————————————————
...दुकानांचे मालक,कर्मचाऱ्यांची अँटिजेन तपासणी
बारामती नगर परिषद व पंचायत समिती आरोग्य विभाग यांनी गुरुवारी संयुक्तपणे शहरातील दुकानातील मालक व कर्मचारी यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोग होणार आहे. आज विविध दुकानांमध्ये  एकुण १०० तपासण्या करण्यात आल्या.यामध्ये एकही कोरोना बाधित आढळला नसल्याचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

Web Title: Corona test of citizens on the road after ‘unlock’ in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.