शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
4
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
5
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
6
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
7
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
8
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
9
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
10
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
11
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
12
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
13
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
14
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
15
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
16
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
17
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
18
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
19
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
20
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

कोरोनाचा पुणे महापालिकेला फटका; उत्पन्न घटल्याने नियोजन कोलमंडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:48 PM

लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प

ठळक मुद्देअर्थसंकल्पाची पुनर्रचना लवकरच केली जाणार बांधकाम, आकाश चिन्ह विभागाकडून मिळणारा महसूलही थांबला गेल्या दीड महिन्यांपासून

पुणे : कोरोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यांपासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. याचा मोठा फटका महापालिकेच्या उत्पन्नावरही झाला आहे.परिणामी पालिका प्रशासनाने सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाची पुर्नरचना करण्याचे नियोजन केले आहे. विविध विकास कामांना व अनावश्यक खर्चांना कात्री लावून या अर्थसंकल्पाची मांडणी केली जाणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, महापालिकेच्या उत्पन्नावर कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटामुळे मोठा परिणाम झाला आहे. अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने, आहे त्या उत्पन्नामध्ये प्राधान्याने अत्यावश्यक सेवांच्या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.उद्याने उभारणी, रस्ते सुशोभिकरण, नवीन वास्तू उभारणी अशा खर्चांना आळा घालण्यात येणार आहे. याचबरोबर ठेकेदारांकडून कंत्राटी पध्दतीने घेण्यात येणाºया कामगार वर्गही कमीत कमी सख्येने घेण्याबाबतचे आदेश पालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनची मुदत वारंवार वाढल्याने राज्य शासनाकडून जीएसटीची रक्कम किती येईल याचीही आता शाश्वती नाही. तसेच मिळकत कराची वसुलीही यावर्षी सवलत दिल्या जाणाऱ्या  पहिल्या दोन महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली आहे. तर बांधकाम, आकाश चिन्ह विभागाकडून मिळणारा महसूलही गेल्या दीड महिन्यांपासून थांबला आहे.  परिणामी सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाची पुनर्रचना प्रशासनाकडून करून हा अर्थसंकल्प लवकरच स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcommissionerआयुक्त