शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना मुळे पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बंद; जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 14:17 IST

पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निर्णय

ठळक मुद्देजिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जायला आता जिल्ह्याबाहेरील नागरिकांना बंदी असणार

पुणे: पुणे शहरातली रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी ग्रामीण भागात मात्र अजून कोरोना रुग्ण सापडत आहेत. हे लक्षात घेता जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जायला आता जिल्ह्याबाहेरील नागरिकांना बंदी असणार आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद आणि पोलिस अधिक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.

 पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नयनरम्य अशी पर्यटने स्थळे आहेत. पावसाळ्यात दंड किल्ल्यांसह या पर्यटन स्थळांवर पर्यटक गर्दी करत असतात. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी, ग्रामीण पोलीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने काही बंधने घालण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे पुणे जिल्ह्याबाहेरील नागरिकांना पुण्यातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. “पुण्यातील पर्यटन स्थळांची यादी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवली आहे.

पर्यटन स्थळांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश काढण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पोलीस सुरक्षा आणि बॅरिकेड लावण्यात येणार आहेत. पुणे खोपोली आणि पुणे तळेगाव हायवे च्या टोलनाक्यावर फ्लेक्स लावण्यात येणार आहेत. त्याठिकाणी पर्यटन स्थळांवर गर्दी टाळण्याच्या हेतूने बंदी घालण्यात आली आहे अशी सूचना लावण्यात येणार आहेत” असे प्रसाद म्हणाले. 

स्थानिकांना परवानगी 

जिल्ह्यातील अनेक भागात बाहेरून नागरिक पर्यटनाला येत असतात. पण कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर बाहेरील नागरिकांना परवानगी नसणार आहे. त्यानुसार चेक पोस्ट वर पोलीस बंदोबस्त असणार आहे. ग्रामीण भागात स्थानिक नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्या भागात आरोग्य सुविधाही अत्यल्प आहेत. त्यांचा कोरोनापासून बचाव होणे गरजेचे आहे. बाहेरील नागरिक त्यांच्या संपर्कात येऊन कोरोनाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे असे आव्हान  प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीtourismपर्यटनMaharashtraमहाराष्ट्र