शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे पतीचे झाले निधन;पत्नीनेही संपवले जीवन; २ लेकरांवर कोसळले दुःखाचे आभाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2020 14:01 IST

अवघ्या दोन महिन्यांमध्ये नऊ आणि अकरा वर्षांच्या चिमुरड्यांचे माता-पित्याचे छत्र हरपल्याने परिसरातून हळहळ

 पिंपरी : दोन महिन्यांपूर्वी कोरोनामुळे पतीचे निधन झाले होते. पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना भोसरीतील फुलेनगर येथे शुक्रवारी (दि. १८) घडली. अवघ्या दोन महिन्यांमध्ये नऊ आणि अकरा वर्षांच्या चिमुरड्यांचे माता-पित्याचे छत्र हरपल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  गोदावरी प्रकाश खजुरकर (वय ३०, रा. फुलेनगर भोसरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचा नाव आहे. प्रकाश उर्फ गुरुबशा खजुरकर (वय ३५) यांचे दोन महिन्यांपुर्वी १८ तारखेलाच कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या मागे ११ वर्षांची मुलगी, ९ वर्षांचा मुलगा आणि ५२ वर्षांची आजी असा परिवार आहे. प्रकाश खजुरकर यांचा टीव्ही दुुरुस्तीचा व्यावसाय होता. लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्याने त्यांनी नुकताच झेरॉक्सचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र, याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे प्रकाश यांचा दोन महिन्यांपुर्वी १८ तारखेलाच मृत्यू झाल्याची माहिती भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अमोल डेरे यांनी दिली.  पतीच्या मृत्युची तारीख १८ होती. त्या दिवशी अमावस्या होती. तेव्हापासून पत्नी गोदावरी पतीच्या विरहाने व्याकूळ झाली होती. गुरुवारपासून त्या पतीच्या वियोगाने रडत असल्याचे त्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सांगितले. शुक्रवारी (दि. १८) पतीच्या मृत्युच्या तारखेच्या दिवशीच सकाळी पावणे नऊच्या सुमारास घरातील दुसऱ्या मजल्यावर जाऊन त्यांनी गळफास घेतला. खजुरकर कुटुंब मूळचे कर्नाटकचे असून, गेल्या ३५ वर्षांपासून फुलेनगर परिसरात वास्तव्यास आहे.  

टॅग्स :bhosariभोसरीDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस