कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढली चारचाकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:53+5:302021-07-23T04:08:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या काळात अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करण्यास टाळत आहे. परिणामी प्रवासी ...

Corona breaks passenger traffic; Four-wheeler grown in every house! | कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढली चारचाकी !

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढली चारचाकी !

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या काळात अनेक जण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करण्यास टाळत आहे. परिणामी प्रवासी वाहतूकीचा कमी वापर होत आहे. या काळात स्वतःच्या दुचाकी व चारचाकीतुन प्रवास करण्याकडे ओढा वाढला आहे. यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनाच्या विक्रीत वाढ झाली. तर दुसरीकडे रिक्षा व टॅक्सी यांच्या संख्येत घट झाली आहे.

कोरोनाच्या काळात शाळा, कॉलेज, आय टी कंपन्याचे कार्यालय बंद झाले. त्यामुळे नियमितपणे रिक्षा व टॅक्सी ने प्रवास करणारा हा वर्ग रिक्षा पासून दुरावला. त्यामुळे रिक्षा चालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.परिणामी अनेकांनी रिक्षा व टॅक्सीच्या व्यवसायकडे पाठ फिरवली.

बॉक्स

दुचाकी व चारचाकीची विक्री वाढली

वर्ष दुचाकी चारचाकी

२०१९ १,७६,३१४ ४७,६१७

२०२० १,६७,४०६ ४७,५८४

२०२१ १,०८,२०० ५१,०१६

(जुलै )

बॉक्स

रिक्षा, टॅक्सीची विक्री घटली

वर्ष रिक्षा टॅक्सी

२०१९ १६,०४४ ६७३२

२०२० ११,७६५ ४५५१

२०२१ २,८३२ ३२४

(जुलै)

प्रतिक्रिया

“कोरोनाच्या काळात रिक्षा व्यवसायला मोठा फटका बसला. त्यामुळे अनेकांनी हा व्यवसाय सोडला. तसेच आरटीओ कार्यालयाने रिक्षा स्क्रॅप करणे थांबविले. त्यामुळे जुन्या रिक्षा स्क्रॅप करून नवीन रिक्षा घेणे थांबले आहे.”

बापू भावे, खजिनदार , पुणे रिक्षा फेडरेशन , पुणे.

Web Title: Corona breaks passenger traffic; Four-wheeler grown in every house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.