शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

कोथिंबीरीने खाल्ला भाव! शेकडा उच्चांकी ४ हजार मिळाला दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 12:41 IST

बारामती :  इंदापूर बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव बाजारात कोथिंबीरीने चांगलाच भाव खाल्ला आहे. सध्या बाजारात टोमॅटो, वांगे, कोथिंबीर आदीचे ...

बारामती: इंदापूर बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव बाजारात कोथिंबीरीने चांगलाच भाव खाल्ला आहे. सध्या बाजारात टोमॅटो, वांगे, कोथिंबीर आदीचे दर तेजीत आहेत. कोथिंबीरीला शेकडा उच्चांकी ४ हजार दर मिळाला आहे. तर मागील काही दिवसांमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे.

अधिक माहिती देताना सभापती दत्तात्रय फडतरे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये इंदापूर बाजार समितीमध्ये प्रथमच भाजीपाला लिलाव बाजार सुरू करण्यात आले होते. माजी सभापती अप्पासाहेब  जगदाळे, आमदार तथा उपसभापती यशवंत माने यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये प्रथमच सायंकाळी भाजीपाला लिलाव घेणारी इंदापूर बाजार समिती पहिलीच बाजार समिती ठरली होती. दिवसभराच्या तोड्यानंतर शेतातून थेट बाजारात येणारा ताजा तरकारी माल यामुळे बाजारात तरकारी मालाला चांगला उठाव मिळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना जादा दराचा फायदा देखील होत आहे. निवडक माल, खात्रीशीर वजनमाप आणि उच्चांकी बाजारभाव यामुळे  इंदापूरसह आजूबाजूच्या तालुक्यातून देखील भाजीपाला इंदापूर बाजार समितीमध्ये येऊ लागला आहे.

बाजारभावप्रकार बाजारभाव (प्रति १० किलो)टोमॅटो- २०० ते ८००कारले पांढरे- २०० ते २५०कारले हिरवे- २५० ते ३००घेवडा - ३०० ते ४५०भेंडी- १८० ते २२०काकडी - १८० ते २२०फ्लॉवर- ३०० ते ३५०कोबी- १०० ते १५०मिरची हिरवी- १५० ते २००गवार गावरान- ५०० ते ६००गवार पुणेरी - ३५० ते ४५०शेवगा - ५०० ते ६००ढोबळी - २०० ते ४००मेथी (शेकडा) - १००० ते १२००पालक शेकडा - ५०० ते ८००कोथींबीर शेकडा - १००० ते ४०००

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीIndapurइंदापूर