कोथिंबीर झाली मातीमोल

By Admin | Updated: December 27, 2014 22:52 IST2014-12-27T22:52:33+5:302014-12-27T22:52:33+5:30

मेथी, कोथिंबीर यांचे बाजारभाव कमी झाले आहेत. कोथिंबिरीच्या एका जुडीला एक रुपया बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्च वसूल होत नाही.

Coriander leaves were made of methimol | कोथिंबीर झाली मातीमोल

कोथिंबीर झाली मातीमोल

मंचर : मेथी, कोथिंबीर यांचे बाजारभाव कमी झाले आहेत. कोथिंबिरीच्या एका जुडीला एक रुपया बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्च वसूल होत नाही. या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कमी दिवसांत येणारे पीक म्हणून मेथी, कोथिंबिरीचे उत्पादन शेतकरी घेतो. एका महिन्यात हे पीक घेता येते, शिवाय मागील वर्षभरात दोन्ही पिकांना चांगला बाजारभाव मिळाला आहे. निसर्गाच्या तडाख्याने अनेकदा मेथी, कोथिंबिरीचे उत्पादन घटले. त्यावेळी आवक कमी होऊन या पिकांना उच्चांकी बाजारभाव मिळाला होता. मेथी कोथिंबिरीचे बी महागले आहे. शिवाय खते औषधे यांचा विचार केला, तर जास्त भांडवल शेतकऱ्यांना गुंतवावे लागत आहे.
मागील पंधरा दिवसांपासून दरात घसरण होत आहे. गुरूवारी रात्री मेथीच्याा १३ हजार ६४२ जुड्यांची आवक झाली. त्यास शेकडा ५६० ते १०७५ रूपये बाजारभाव मिळाला. कोथिंबिरीच्या २२ हजार ९१२ जुड्यांची आवक होऊन त्यास शेकडा १०१ ते ९०१ रूपये असा बाजारभाव मिळाला. शेपूला ३५१ ते ४५१ रूपये बाजारभाव मिळाला.
बाजारभाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. भांडवली खर्च वाढतोय. वातावरण चांगले असल्याने उत्पादन चांगले निघते. मात्र या बाजारभावात शेतकऱ्यांचे भांडवल वसूल होणे अवघड आहे. शेतकरी बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहेत. मेथी, कोथिंबीर यांची आवक नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीपराव ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Coriander leaves were made of methimol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.