तांब्याच्या तारा चोरणारे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:17 IST2017-08-04T03:17:26+5:302017-08-04T03:17:26+5:30

एमएसईबीच्या इलेक्ट्रिक डीपीची मोडतोड करून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाºया ६ सराइतांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींनी तळेगाव दाभाडे

 Copper Thieves | तांब्याच्या तारा चोरणारे गजाआड

तांब्याच्या तारा चोरणारे गजाआड

पुणे : एमएसईबीच्या इलेक्ट्रिक डीपीची मोडतोड करून त्यातील तांब्याच्या तारा चोरणाºया ६ सराइतांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपींनी तळेगाव दाभाडे, लोणीकंद, चाकण परिसरात अशा प्रकारचे २४ गुन्हे केल्याचे उघकीस आले असून, त्यांना ७ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी गुरुवारी दिला.
अब्दुलकलाम महंमदयाकुब शेख (वय ३३, रा. चिखली), जल्लाउद्दीन ऊर्फ साधु महमदरजा मनियार (वय २३, रा. वर्सोली फाटा, ता. खेड), रमेशकुमार ऊर्फ कल्लू मातबर चौहान (वय २२), कुतुबुद्दीन महमदसन शेख (वय ३५, दोघेही, रा. चिखली), नुरमहमद हबीब शेख (वय २४) आणि अमीरउद्दीन हैतुल्ला शेख (वय २५, दोघेही, रा. नाशिक) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत एमएसईबीचे अधिकारी गणपत बुरसे (वय ४५) यांनी फिर्याद दिली आहे. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार किशोर कोरडे, डी. डी. लिम्हण, सी. डी. झेंडे, दत्तात्रय जगताप, शरद वाबळे व त्यांच्या सहकाºयांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांना अटक केली.
तळेगाव दाभाडे येथील रियानू सोसायटीजवळ इलेक्ट्रिक डीपीची मोडतोड करून ४५ हजार रुपये किमतीची तांब्याची वायर चोरीसह आरोपींनी असे २४ गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. संशयितांचे आणखी कोण साथीदार आहेत का हे शोधण्यासाठी, चोरीसाठी वापरत असलेली साधने जप्त करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक जिल्हा सरकारी वकील मच्छिंद्र गटे यांनी केली.

Web Title:  Copper Thieves