शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

कोरेगाव भीमा घटना सुनियोजित, शोध समितीचा दावा, पोलीस अधीक्षकांना देणार घटनेचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 01:35 IST

कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. स्थानिक पोलीस यंत्रणेला अनुचित प्रकार होणार असल्याचे माहिती असूनही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा शोध समितीतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

पुणे : कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. स्थानिक पोलीस यंत्रणेला अनुचित प्रकार होणार असल्याचे माहिती असूनही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा शोध समितीतर्फे शनिवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक क्षेत्रात काम करणाºया १० जणांची शोध समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भारिप बहुजन महासंघाचे प्रा. म. ना. कांबळे, राहूल मखरे, विकास साळवे, दत्ता पोळ, राजेंद्र गायकवाड, किरण शिंदे, रमाकांत खंडे आदींचा समावेश होता.समितीने शिक्रापूर, लोणी काळभोर, कोरेगाव भीमा, पेरणे, वढू आदी गावांमधील नागरिकांशी संवाद साधला. त्यावर प्राप्त माहितीच्या आधारे अहवाल तयार केला असून, सोमवारी (दि.२२) तो पोलीस अधीक्षकांना दिला जाणार आहे.धेंडे म्हणाले, कोरेगाव भीमा घटना हा दलित विरूध्द मराठा या समाजातील संघर्ष नाही. काही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.आम्ही या घटनेशी संबंधित अनेकांशी संवाद साधला. त्यांचे सुमारे ५०० फोटो, व्हिडीओ आणिआॅडिओ संकलित केले. त्यातून हापूर्व नियोजित कट होता.हल्ला झाल्यानंतर दंगल उफाळून आली होती. लहान मुलांचे भांडण झाले, तरी दलित वस्तीवर हल्लाहोऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येथे तत्काळ सामाजिक सलोख्याचे वातावरण करण्याची गरज आहे.मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे हे या कटात सहभागी असल्याचे उपलब्ध माहितीच्या आधारे दिसून येते, असा दावा प्रा. कांबळे यांनी केला.समाधीचे शुद्धिकरण केले?केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर, काही जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी समाधीचे शुद्धिकरण केले, अशी माहिती शोध समितीला मिळाल्याचा दावा डॉ. धेंडे यांनी केला.नुकसानग्रस्तांनी भरपाई देणार -जिल्हाधिकारी सौरभ रावकोरेगाव भीमा, सणसवाडी व अन्य ठिकाणच्या नुकसानीचे साडेदहा कोटींचे पंचनामे करण्यात आले असून, आॅडिटनंतर नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार आहे. दंगलीतील कारवाईत निर्दोषांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, असे सांगत गावातील सामाजिक सलोख्याबाबत ग्रामस्थांवर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी कौतुकाची थाप दिली. कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेत, श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधीस्थळ व गोविंद गायकवाड यांच्याही समाधीस्थळाची जिल्हाधिकारी राव यांनी पाहणी केली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव