शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला ठेंगा..! सहकार विद्यापीठ गुजरातलाच; आणंद येथील ग्रामीण व्यवस्थापन संस्थेत होणार सुरू

By नितीन चौधरी | Updated: April 10, 2025 10:27 IST

सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराष्ट्राला मात्र ठेंगा दाखविण्यात आला आहे.

पुणे : केंद्र सरकारने संसदेत घोषणा केलेल्या सहकार विद्यापीठाची स्थापना अखेर गुजरातमध्येच करण्याचा निर्णय सहकार मंत्रालयाने घेतला आहे. हे विद्यापीठ पुण्यातील वैकुंठलाल मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेत स्थापन करण्याची मागणी असतानाही ते आता गुजरातमधील आणंद येथे असलेल्या ग्रामीण व्यवस्थापन संस्थेत स्थापन केले जाणार आहे. सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराष्ट्राला मात्र ठेंगा दाखविण्यात आला आहे.

पुण्यातील या संस्थेचे महत्त्व अजिबात कमी होणार नसून, ही संस्था विद्यापीठाचे एक महत्त्वाचे केंद्र असेल, असे स्पष्टीकरण केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले. ते पुण्यात पत्रकारांची बोलत होते. ते म्हणाले, “संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्रिभुवन सहकार विद्यापीठाचे विधेयक दोन्ही सभागृहांत संमत करण्यात आले. या विद्यापीठाची स्थापना आणंद येथील ग्रामीण व्यवस्थापन संस्थेत केली जाणार आहे. संस्थेकडे सध्या साठ एकर जमीन उपलब्ध असून, शेजारील ४० एकर जमीनदेखील उपलब्ध होणार आहे. संस्थेमध्ये असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जोरावर दहावी-बारावीनंतरचे काही लघु अभ्यासक्रम तसेच पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी.चे अभ्यासक्रम लवकरच सुरू केले जाणार आहेत.

पुण्यातील वैकुंठलाल मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था ही या विद्यापीठाची एक प्रमुख संस्था म्हणून कार्यरत राहणार आहे. त्यामुळे संस्थेचे महत्त्व अजिबात कमी होणार नाही. विद्यापीठाच्या कारभारात संस्थेचे वेगळे महत्त्व असेल. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र प्रत्येक राज्यात ठेवण्यात येणार असून, प्रादेशिक भाषांमध्ये अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या विद्यापीठात संशोधन, शिक्षण आणि विकास या तिन्ही पातळ्यांवर काम केले जाणार आहे, असेही माेहाेळ म्हणाले.देशात सहकाराच्या माध्यमातून सुमारे ३० कोटी नागरिक ३० वेगवेगळ्या उपक्रमांत गुंतले असून, सुमारे सव्वा कोटी नागरिकांना रोजगार मिळाला आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले. केंद्र सरकारने ग्रामस्तरावरील प्राथमिक कृषी सहकारी संस्था अर्थात विविध कार्यकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचे ठरविले आहे. यासाठी २ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यात ४३ हजार संस्थांना सामाईक सुविधा केंद्र चालविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. तर ६८ हजार संस्थांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. नागरी सहकारी बॅंकांसाठीही एका शिखर संस्थेची स्थापना करण्यात आल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmurlidhar moholमुरलीधर मोहोळGujaratगुजरात