पुणे : अल्पवयीन दिव्यांग मुलीशी अश्लील चाळे करणा-याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी सुनावली. निलेश किसन निकत (वय २८, रा. जनता वसाहत, पर्वती) असे शिक्षा देण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित १४ वर्षीय मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. ९ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५ ते साडेसात दरम्यान दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. घटनेच्या दिवशी ती सार्वजनिक शौचालयात गेली होती. त्यावेळी निलेश तेथे गेला व त्याने पीडितेशी अश्लील चाळे केले. तुला १०० रुपये देतो, असे पीडितेला म्हणाला. त्यावेळी पीडित ओरडली. त्यावेळी जवळील महिला तेथे गेल्या. त्यामुळे तो पळून गेल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात दत्तवाडी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
दिव्यांग मुलीशी अश्लील चाळे करणा-याला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 21:20 IST
अल्पवयीन दिव्यांग मुलीशी अश्लील चाळे करणा-याला ३ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी सुनावली.
दिव्यांग मुलीशी अश्लील चाळे करणा-याला सक्तमजुरी
ठळक मुद्देपीडित मुलीची साक्ष ठरली महत्त्वाची दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला हा प्रकार