एलबीटी भरण्याची चार बँकांमध्ये सोय
By Admin | Updated: June 17, 2015 00:58 IST2015-06-17T00:58:11+5:302015-06-17T00:58:11+5:30
शहरातील व्यापाऱ्यांना एलबीटी कर आता बँकांमार्फतही भरता येणार आहे, करवसुलीचे काम अॅक्सीस, आयसीआयसीआय

एलबीटी भरण्याची चार बँकांमध्ये सोय
पिंपरी : शहरातील व्यापाऱ्यांना एलबीटी कर आता बँकांमार्फतही भरता येणार आहे, करवसुलीचे काम अॅक्सीस, आयसीआयसीआय, बँक आॅफ महाराष्ट्र आणि बँक आॅफ बडोदा या बँकांमार्फत करून घेण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.
महापालिकेचे सर्व आर्थिक व्यवहार सध्या बँक आॅफ बडोदामधून केले जातात. मात्र, महापालिकांमध्ये एलबीटी ही करप्रणाली सुरू केल्यानंतर त्याची व्यापकता लक्षात घेऊन व्यापाऱ्यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न महापालिकेने वेळोवेळी केला आहे. त्यामध्ये आॅनलाइन एलबीटी भरण्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला होता. राज्य शासनाने खासगी बँकेद्वारे व्यवहार करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्याप्रमाणे महापालिकेकडून रिझर्व्ह बँकेची मान्यता असणाऱ्या चार बँकांमार्फत एलबीटी वसुलीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अॅक्सीस, आयसीआयसीआय, बँक आॅफ महाराष्ट्र आणि बँक आॅफ बडोदा या बँकांचा समावेश आहे. एलबीटी विभागाप्रमाणेच कर व इतर विभागांकडील दैनंदिन जमा गोळा करण्यासाठीचे कामकाज एचडीएफसी बँकेला दिले आहे. (प्रतिनिधी)