शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी राफेल करारावरुन उठवलेला वादंग म्हणजे निवडणुकीचा प्रपोगंडाच : डॉ. सुभाष भामरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 15:02 IST

राफेल करार हा युपीएच्या काळात पूर्ण झालेला नाही. तसेच त्यावेळी राफेल विमानाची किंमत सुध्दा ठरलेली नव्हती. तरीही विरोधक राफेलची किंमत सांगत आहेत.

ठळक मुद्दे३६ विमाने २०१९ पर्यंत भारताला मिळणे अपेक्षित युपीए सरकारने ठरवलेल्या किंमतीपेक्षा सध्याची राफेलची किंमत जवळपास ९% कमीभारतीय बनावटीच्या १२६ तेजस या हलक्या लढाऊ विमानाची निर्मिती करण्याची एचएएलला आॅर्डर

पुणे: राफेल करार हा युपीएच्या काळात पूर्ण झालेला नाही. तसेच त्यावेळी राफेल विमानाची किंमत सुध्दा ठरलेली नव्हती. तरीही विरोधक राफेलची किंमत सांगत आहेत. त्यामुळे राफेल करारावरुन विरोधकांनी उठवलेला वादंग म्हणजे हा आगामी निवडणुकीचा प्रपोगंडा आहे, असे मत संरक्षण राज्य मंत्री डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.  एल अँड टी आणि इंडियन नॅशनल अकॅडमी आॅफ इंजेनिअरिंग द्वारे आयोजित इंजिनिअरींग काँकलेव्ह २०१८ या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन भामरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रम झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  भामरे म्हणाले, युपीए सरकारने ठरवलेल्या किंमतीपेक्षा आम्ही केलेल्या करारात राफेलची किंमत जवळपास ९% कमी आहे. भारतीय हवाई दलाला ४२ स्क्वार्डनची गरज आहे.  सध्या ३३ स्क्वार्डन कार्यरत असून,येत्या काळात मिग विमाने कार्यमुक्त झाल्यावर ही संख्या आणखी कमी होणार आहे. यामुळे भारतीय हवाईदलाची ताकद वाढवण्यासाठी राफेलची गरज आहे. त्यासाठीे ३६ विमाने २०१९ पर्यंत भारताला मिळणे अपेक्षित आहे. भारतीय बनावटीच्या १२६ तेजस या हलक्या लढाऊ विमानाची निर्मिती करण्याची एचएएल ला आॅर्डर देण्यात आली आहे. त्यामाध्यमातून ४२ स्क्वार्डनची गरज भागविण्यात येणार आहे. एचएएल ला डावलून रिलायन्स ला राफेल चे काम दिल्याच्या आरोपीला उत्तर देताना भामरे म्हणाले की एचएएल ला डावलण्याचा प्रश्न येत नाही. सध्या एचयेयेलकडे सुखोई, तेजस बनविण्याचे कंत्राट मिळाले आहे. जवळपास १ लाख करोड रुपयांची कामे एचएएलमध्ये सुरु आहे. यामुळे ते व्यस्त आहे. असे प्रतिपादन संरक्षण राज्य मंत्री डॉ. भामरे यांनी केले. 

टॅग्स :PuneपुणेRafale Dealराफेल डील