शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो-शिवसृष्टीचा वाद पुन्हा पेटणार

By admin | Updated: February 20, 2015 00:20 IST

कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर आरक्षित करण्यात आलेल्या नागरी आणि सांस्कृतिक केंद्राची जागा आता मेट्रोसाठीही वापरता येणार आहे.

पुणे : शहराच्या सुधारित हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्यात (डीपी) कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर आरक्षित करण्यात आलेल्या नागरी आणि सांस्कृतिक केंद्राची जागा आता मेट्रोसाठीही वापरता येणार आहे. या जागेवर या पूर्वीच शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असताना, ही आरक्षित जागा मेट्रोच्या डेपोसाठी वापरण्याची शिफारसही समितीने केल्याने, या जागेवर आता शिवसृष्टी उभा राहणार की मेट्रो? यावरून पुन्हा वाद पेटणार आहे. हा अहवाल उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या विशेष सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून, मुख्य सभा या शिफारशींबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोथरूड येथे असलेल्या कचरा डेपोच्या २७ एकर जागेवर शिवसृष्टी प्रस्तावित करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या डेपोसाठी डीएमआरसीच्या अहवालातही ही जागा दर्शविण्यात आली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन २०१२ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या, या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात वाद टाळण्यासाठी ही जागा सिव्हिक अँड कल्चरल सेंटर म्हणून आरक्षित करण्यात आली, तर या ठिकाणी केवळ मेट्रोमार्ग दाखवित मेट्रोचे एक क्रमांकाचे स्टेशन गायब करण्यात आले. त्यानंतर महापालिकेने ठराव करून, या जागेशेजारी बीडीपीच्या १०० एकर जागेतील काही जागा मेट्रोसाठी द्यावी, असा मध्यम मार्ग काढण्यात आला. तसेच, या ठिकाणी जमिनीखाली मेट्रो स्टेशन आणि वरती शिवसृष्टी उभारण्याबाबत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) कडे पाठविला. मात्र, डीएमआरसीने त्यास नकार देत, या ठिकाणी एकच काम करता येणे शक्य असल्याचे पालिकेस कळविण्यात आले. त्यामुळे अंतिम मान्यतेच्या टप्प्यात असलेल्या मेट्रोसाठीच्या डेपोच्या जागेची पालिकेकडे अडचण होती. मात्र, समितीने ही शिफारस करून, ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यातून नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.‘कल्चरल सेंटर’मध्ये मेट्रोही ४पहिला आराखडा प्रसिद्ध करताना, प्रशासनाने कचरा डेपोच्या जागेवर कल्चरल सेंटर दाखविले होते. त्यानुसार विकास नियंत्रण नियमावलीत असलेल्या नियमांप्रमाणे कल्याणकारी केंद्र, समाज मंदिर, आर्ट गॅलरी, म्युझियम, क्लब हाऊस, बालभवन, टेलीफोन, पोलीस, पोस्ट आॅफिस, बँक, दवाखाना, पार्किंग, उद्यान, लहान मुलांसाठी खेळणी, चित्रपटगृह तसेच नाट्यगृह, प्रदर्शन केंद्र, स्मारक तसेच प्रदर्शन केंद्र उभारू शकता येणार होते. मात्र, चेतन तुपे, बापूराव कर्णेगुरुजी, अ‍ॅड. अभय छाजेड तसेच अ.रा. पाथरकर यांच्या समितीने दिलेल्या नियोजन अहवालात वाहतुकीचे डेपो आणि प्रस्तावित मेट्रोचा डेपोही करू शकता येईल, अशी शिफारस केली आहे