शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दूरदर्शनच्या कॉपीराइटवरून वाद : माजी निर्मात्यास स्वसंग्रहातील कार्यक्रम सादरीकरणास मनाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 21:59 IST

मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांच्या एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या  साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांच्या स्वसंग्रहातील दुर्मिळ ठेव्यावरच कॉपीराईटच्या मुदयावरून प्रश्नचिन्ह  उपस्थित झाले आहे. Controversy over Doordarshan's copyright

नम्रता फडणीसपुणे : मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांच्या एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या  साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांच्या स्वसंग्रहातील दुर्मिळ ठेव्यावरच कॉपीराईटच्या मुदयावरून प्रश्नचिन्ह  उपस्थित झाले आहे. या कार्यक्रमांवर मुंबई दूरदर्शनचा हक्क असल्यानेसार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमांचे परवानगीविना सादरीकरण करता येणार नाहीअसा आक्षेप मुंबई दूरदर्शनकडून नोंदविण्यात आला आहे.           तीस ते चाळीस वर्षांपूर्वी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या मान्यवरांचे मुंबई दूरदर्शनवर कार्यक्रम करताना अरूण काकतकर यांनी काहींचे खाजगी रेकॉर्डिंग करून ते जतन करण्याचे  काम केले.या संग्रहात हिरोबाई बडोदेकर, मोगूबाई कुर्डीकर, माणिक वर्मा यांनी गप्पा आणि आठवणीतून खुलवलेली मैफल, बाकीबाब, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट या कवींची मनोगत तसेच मंगेशकर कुटुंबियांची संवाद आणि गाण्यांची मैफल,राम शेवाळकर, डॉ. जयंत नारळीकर यांची व्याख्याने, अशा नानाविविध दुर्मिळगोष्टींचा समावेश आहे.

       हा चित्रफिती आणि श्राव्यफितीचा अमूल्य ठेवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त करून टप्याटप्याने या ठेव्याचे दर्शन रसिकांना घडविण्याचे नियोजन करण्यात आले होते. या सुंदरमालिकेतील ‘शांकुतल ते मानापमान’ हा कार्यक्रम येत्या 1 सप्टेंबर रोजी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये सादर होणार होता. मात्र मुंबई दूरदर्शनचे सहाय्यक संचालक एम.एस थॉमस यांनी कॉपीराईटचा मुददा उपस्थित करत या खाजगी ठेव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  या संदर्भात त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मेल पाठवल्याने हा कार्यक्रमच रदद करण्यात आला.

       मात्र स्वसंग्रही असलेले हे कार्यक्रमदूरदर्शनकडे देखील नाहीत असा युक्तीवाद काकतकर यांनी केला आहे.मुंबई दूरदर्शननेच नाटककार सुरेश खरे यांच्याकडे  ‘शांकुतल ते मानापमान’ ची कॉपी आहे का? अशी विचारणा केली होती. आपले मूळ स्त्रोतच त्यांच्याकडे नाहीत यासारखे दुर्दैव नाही. त्यांच्या संग्रही असलेल्या ब-याचशा टेप्स या नष्ट झाल्या आहेत. दूरदर्शनकडे हा ठेवा असेल तर त्यांनी तो दाखवावा.गेल्या तीस ते चाळीस वर्षात त्यांनी तो का दाखवला नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या कार्यक्रमांचे जाहीर सादरीकरण करून पैसे कमावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दूरदर्शनचे कार्यक्रम  शासनाची प्रोपर्टी  दूरदर्शनचे कार्यक्रम ही शासनाची प्रोपर्टी आहे, त्यावर मुंबई दूरदर्शनचा कॉपराईट आहे. कलाकारांना दूरदर्शनच्या खर्चाने बोलवले जाते, त्यामुळेत्या कार्यक्रमांवर दूरदर्शनचाच अधिकार आहे. कार्यक्रमांचे खासगी रेकॉर्डिंग करून ते स्वसंग्रही ठेवले जाऊ शकते. मात्र सार्वजनिक ठिकाणीदूरदर्शनची परवानगी न घेता त्याचे सादरीकरण करणे हा कॉपीराईटचा भंग आहे.एम.एस थॉमस, व्यवसाय व महसूल विभाग, मुंबई दूरदर्शन 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक