भाजपातील वाद चव्हाटय़ावर

By Admin | Updated: September 27, 2014 23:33 IST2014-09-27T23:33:02+5:302014-09-27T23:33:02+5:30

भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मठकरीसमर्थकांनी शहर भाजपाचे शहर सरचिटणीस श्रीपाद ढेकणो यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार आज घडला.

The controversy in the BJP is at Chawattyay | भाजपातील वाद चव्हाटय़ावर

भाजपातील वाद चव्हाटय़ावर

>पुणो :  भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. विकास मठकरी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने मठकरीसमर्थकांनी शहर भाजपाचे शहर सरचिटणीस श्रीपाद ढेकणो यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार आज घडला.  
शहराध्यक्ष खासदार अनिल शिरोळे आणि माजी खासदार प्रदीप रावत यांच्यासमोरच पुणो स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये हा प्रकार घडला. शिरोळे यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले. मात्र, या प्रकारामुळे भाजपामध्ये शिवाजीनगर  मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. 
भाजपाच्या वतीने शिवाजीनगर मतदारसंघातून माजी नगरसेवक विजय काळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार अनिल शिरोळे, प्रदीप रावत, श्रीपाद ढेकणो यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारस काळे यांच्यासह ही मंडळी पुणो स्टेशन येथाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी गेली. त्या वेळी कार्यकर्ते घोषाणाबाजी करीत होते. त्यात प्रा. मठकरी यांचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. याच वेळी  ढेकणो यांनी प्रा. मठकरी यांच्याबाबत काही कार्यकत्र्यांच्या समोरच अपशब्द वापरले. त्यामुळे या ठिकाणी उपस्थित असलेले  प्रा. मठकरी यांचे  समर्थक चांगलेच संतापले. त्यांनी ढेकणो यांना जाब विचारला तसेच असे शब्द वापरू नये,असे सुनावले, त्या वेळी संतापलेले कार्यकर्ते अचानक आक्रमक झाले आणि   ढेकणो यांच्यावर धावून जात त्यांना शिवीगाळ सुरू केली. 
 
4खासदार  शिरोळे यांनी त्या दोन कार्यकत्र्यांना बाजूला केले आणि ढेकणो यांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तेथून जाण्यास सांगितले; परंतु पुष्पहार अर्पण केल्यानंतर या कार्यकत्र्यांनी पुन्हा शिवीगाळ सुरू केली. या कार्यकत्र्यांना शांत करण्याचा प्रयत्न रावत यांनी केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. ज्या मठकरींनी कार्यकर्ता म्हणून घडविले त्यांना आजारपणावरून नावे ठेवणा-यांचे यापुढे ऐकून घेणार नाही, 
असा इशारा या कार्यकत्र्यांनी दिला. अखेर हा वाद रस्त्यावर आल्यानंतर प्रदीप रावतमठकरी समर्थकांना घेऊन तेथून 
निघून गेले. 

Web Title: The controversy in the BJP is at Chawattyay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.