वाहतूक पोलिसांवर ‘सेल्फी’चे नियंत्रण
By Admin | Updated: December 11, 2014 00:31 IST2014-12-11T00:31:07+5:302014-12-11T00:31:07+5:30
वाहतूक पोलीस हजर राहतात की नाही हे तपासण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी शक्कल लढवली आहे.

वाहतूक पोलिसांवर ‘सेल्फी’चे नियंत्रण
पुणो : अगदी सकाळपासून महत्त्वाच्या चौकांमध्ये होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी सकाळी सातपासून लावलेल्या ठिकाणांवर वाहतूक पोलीस हजर राहतात की नाही हे तपासण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी शक्कल लढवली आहे. नेमून दिलेल्या ठिकाणांवर गेल्याबरोबर तेथूनच मोबाईलमध्ये स्वत:चा सेल्फी काढून तो संबंधित विभागाच्या वाहतूक सहायक आयुक्ताला पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, ठरवून दिलेल्या ठिकाणांवर कर्मचारी अगदी वेळेत पोचत असल्याचे आवाड यांनी सांगितले.
गेल्या वर्षी तत्कालीन वाहतूक उपायुक्त विश्वास पांढरे यांनी नेमून दिलेल्या ठिकाणांवर हजर नसणा:या अकरा कर्मचा:यांना एकाच वेळी निलंबित केले होते. अनेकदा सकाळी उपस्थित झाल्याच्या खोटय़ा स्वाक्ष:या केल्या जातात.
हे प्रकार टाळण्यासाठी तसेच कर्मचारी खरोखरीच नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित आहेत की नाही हे तपासण्यासाठी व्हॉट्सअॅपचा उपयोग करून घ्यायचे ठरवण्यात आले. नेमून दिलेल्या चौकामध्ये कर्मचारी हजर झाल्यानंतर लगेचच त्या चौकामध्ये स्वत:चा ‘सेल्फी’ काढून त्या वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्तांना पाठवला जातो. कर्मचारी त्याच दिवसाचा सेल्फी पाठवतो आहे की जुना पाठवतोय, तो खरेच नेमून दिलेल्या ठिकाणावर आलेला आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी ठाणो अंमलदाराला देण्यात आलेली आहे. त्या संबंधित ठिकाणी जाऊन कर्मचारी आणि त्याचा स्वत:चाही सेल्फी काढून सहायक आयुक्तांना पाठवायला सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, जवळपास सर्वच कर्मचारी आणि ठाणो अंमलदार आपापले सेल्फी काढून सहायक आयुक्तांना पाठवत आहेत. त्यामुळे कामामध्ये शिस्त आणि वक्तशीरपणा येण्यास मदत मिळत असल्याचे उपायुक्त सारंग आवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पोलीस कर्मचा:यांकडून होते टाळाटाळ
4हिंजवडी, कात्रज, स्वारगेट, शिवाजीनगर, पुणो स्टेशन आदी काही महत्त्वाच्या चौकांमध्ये तसेच रस्त्यांवर सकाळी लवकरच मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू होते. या ठिकाणी जर वाहतूक पोलीस नसतील तर वाहतूककोंडी होते.
4त्यामुळे सकाळी सात, आठ आणि नऊ वाजण्याच्या सुमारास वाहतूक कर्मचा:यांना या ठिकाणांवरची डय़ुटी लावण्यात येते. सकाळी जाण्यासाठी पोलीस कर्मचा:यांकडून टाळाटाळ केली जाते.
4ब:याचदा हे कर्मचारी ठरवून दिलेल्या ठिकाणी पोचलेलेच नसतात.