सावता महाराजांच्या समाधीसाठी हातभार लावा : वसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST2021-07-18T04:09:04+5:302021-07-18T04:09:04+5:30

तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील विष्णू गणेश पिंगळे स्मारक येथे संत शिरोमणी सावता महाराज याचे वंशज हभप रमेश महाराज ...

Contribute for the Samadhi of Sawta Maharaj: Vasekar | सावता महाराजांच्या समाधीसाठी हातभार लावा : वसेकर

सावता महाराजांच्या समाधीसाठी हातभार लावा : वसेकर

तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील विष्णू गणेश पिंगळे स्मारक येथे संत शिरोमणी सावता महाराज याचे वंशज हभप रमेश महाराज वसेकर यांनी हुतात्मा विष्णू पिंगळे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी रमेश महाराज वसेकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, मानवाधिकार फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद फुलसुंदर, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख शरद रासकर, स्वप्नील शेलार, प्रकाश शेलार, शोभा हिंगणे उपस्थित होते.

--

१७ तळेगाव ढमढेरे सावता महाराज

फोटो क्रमांक : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज हभप रमेश महाराज वसेकर यांचा सन्मान करताना ग्रामस्थ.

Web Title: Contribute for the Samadhi of Sawta Maharaj: Vasekar