ठेकेदारांची लॉबी मोडून काढणार : संजय जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:24+5:302021-09-06T04:14:24+5:30

जेजुरी : केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत, तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवल्या पाहिजेत. ...

Contractors' lobby to be demolished: Sanjay Jagtap | ठेकेदारांची लॉबी मोडून काढणार : संजय जगताप

ठेकेदारांची लॉबी मोडून काढणार : संजय जगताप

जेजुरी : केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत, तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवल्या पाहिजेत. आपला चुकीच्या कामांना विरोध असून तालुक्यातील ठेकेदार लॉबी मोडून काढणार आहे. भ्रष्टाचार मुक्त पुरंदर हे आपले ध्येय आहे. गुंजवणी प्रकल्पाला आपला विरोध नाही, गुंजवणीपासून ते राखपर्यंत काम सुरु झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले.

जेजुरी येथे पुरंदर तालुका कॉंग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. या प्रसंगी बोलताना आमदार जगताप म्हणाले, गुंजवणी प्रकल्पाचे पाणी पुरंदरमध्ये यावे यासाठी दहा वर्षे तालुका झगडतोय. या प्रकल्पाला विरोध नाही, मात्र यात होणाऱ्या चुकीच्या कामाला विरोध आहे. गुंजवणी प्रकल्पाचे पाणी पुरंदरला येताना ते गुंजवणी धरणापासूनच काम सुरु करायला हवे. पुरंदरच्या ज्या भागात पाण्याचा प्रश्न आहे त्याच भागात पाणी पोहचले पाहिजे. या कामात आपण भ्रष्टाचार होऊ देणार नाही, तालुक्यात जलशिवार योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. पुरात अनेक बंधारे वाहून गेले आहेत. त्याची चौकशी सुरु आहे

आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली जेजुरी शहराचा विकास झाला आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात जेजुरी पालिकेला दुसरा क्रमांक मिळून १० कोटी रुपयांचे बक्षीस पालिकेला मिळाले आहे. जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आरखड्यासाठी ३५० कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातील १०९ कोटी रुपयांची कामे सुरु होणार असल्याचे जेजुरी नगरपरिषदेच्या नगरध्यक्षा वीणा सोनवणे यांनी सांगितले, तर सासवड पालिकेने स्वच्छ सर्व्हक्षन मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला असून १५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली १०० कोटी रुपयांची विकासकामे झाली असल्याचे सासवड पालिकेचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समितीच्या सदस्य सुनिता कोलते, सोनाली यादव, तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण,युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष माउली यादव, राज्य कॉंग्रेस कार्यकारिणीचे सरचिटणीस गणेश जगताप, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगताप, कॉंग्रेसचे कार्यकर्ते अॅड. विजय भालेराव,विजय वढणे,सुहास लांडगे, महेश ढमढेरे, जेजुरी नगरपालिकेचे उपनगरध्यक्ष गणेश निकुडे, गटनेते सचिन सोनवणे नगरसेवक अजिंक्य देशमुख,गणेश शिंदे, महेश दरेकर बाळासाहेब सातभाई, नगरसेविका रुक्मिणी जगताप,शीतल बयास,पोर्णिमा राउत, माजी नगरसेवक रवींद्र जोशी,महेश काळे, सदानाना बारसुडे, जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकडे, देवा नाझीरकर, भारती गायकवाड ,पूनम शिंदे, जेजुरी व सासवड नगरपालिकेचे नगरसेवक,व मोठ्या संख्यने कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात शिवसेना,भाजपा,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तेवीस कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच तालुक्यातील विविध समित्यांवर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे स्वागत सचिन दुर्गाडे यांनी केले तर सूत्रसंचालन विकास इंदलकर यांनी केले. आभार जेजुरी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष ईश्वर दरेकर यांनी मानले.

जेजुरी येथे पुरंदर तालुका कॉंग्रेस पक्ष्याच्या मेळाव्यात बोलताना आमदार संजय जगताप.

050921\save_20210905_192044.jpg

काँग्रेस मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ संजय जगताप

Web Title: Contractors' lobby to be demolished: Sanjay Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.