ठेकेदार पावसाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: June 19, 2015 22:36 IST2015-06-19T22:36:43+5:302015-06-19T22:36:43+5:30
शहरात प्रशासनामार्फ त नालेसफ ाईचा देखावा सुरू आहे. सहा क्षेत्रीय कार्यालये स्तरावर सहा ठेकेदारांना कामे देण्यात आले आहेत. ठेकेदारासोबत प्रशासनही

ठेकेदार पावसाच्या प्रतीक्षेत
सुवर्णा नवले , पिंपरी
शहरात प्रशासनामार्फ त नालेसफ ाईचा देखावा सुरू आहे. सहा क्षेत्रीय कार्यालये स्तरावर सहा ठेकेदारांना कामे देण्यात आले आहेत. ठेकेदारासोबत प्रशासनही या कामाच्या बाबतीत सुस्तावलेले दिसून येत आहे. आतापर्यंत नालेसफाईची ८० टक्के कामे झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या प्रमाणात हे काम झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ठेकेदार व कर्मचाऱ्यांना कामाची अंतिम मुदत १५ जूनपर्यंत होती.
काही ठिकाणी सफ ाई करुन राडारोडा तसाच ठेवण्यात आला आहे. ठेकेदारामार्फ त ७६ नाले व महापालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून१२७ नाल्यांची सफाई करण्यात येणार आहे. एकूण नाल्यांची संख्या २१३ आहे. मात्र, कामाचे वाटप प्रभागस्तरावर सोईस्कररीत्या होऊनही ही कामे होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
पावसाळा वेळेत सुरू न झाल्याने प्रशासन व ठेके दारांनीही गांभीर्याने कामे केली नाहीत. वर्षभर सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नाले तुंबलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. नाले साफ करण्याच्या नावाखाली प्रशासन लाखो रुपये खर्च करत आहे. नालेसफ ाईसाठी कायमचा कोणताच तोडगा अद्यापपर्यंत प्रशासनाने काढलेला नाही.
प्रभागस्तरावर अद्यापपर्यंत ‘ई’ प्रभागाचे स्टॉर्म वॉटरचे कामही सुरू झालेले नाही. ‘ई’ प्रभागाची निविदा काढण्यात आली आहे. मात्र ठेकेदाराकडून कमी रकमेच्या निविदेनुसार आकडा ठरलेला नसल्यामुळे कामास सुरुवात झाली नाही. ‘ई’ प्रभागात ३६२८ स्टॉर्म
वॉटर चेंबर सफ ाई अजूनही रखडलेली आहे. तसेच संत तुकारामनगर,
भोसरी एमआयडीसी, औद्योगिक वसाहत टी सेक्टर, कासारवाडी, शंकरवाडी, लालटोपीनगर येथे नालेसफाईचे कामे रेंगाळलेली आहेत. या सर्व कामांसाठी अंदाजपत्रकीय निविदा ४२,८४,५७७ रुपयांची आहे. मात्र, अपेक्षित दराप्रमाणे हा खर्च २८,२६,३८६ रुपये आहे.(क्रमश:)
नियोजनासाठी बैठक
-सर्व प्रभाग स्तरावरील कामकाजाच्या मुदती संपल्या, तरी एका प्रभागाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही. प्रभागांना कामांचा आदेश १० मे रोजी देण्यात आलेला होता. प्रत्येक प्रभागाना कामाच्या वेळा ठरवून देण्यात आलेल्या आहेत. तसेच कामाचे नियोजन बैठका घेऊनही सांगण्यात आले होते. ठेकेदार व कर्मचाऱ्यांना कामाची अंतिम मुदत दि. १५ जून पर्यंत देण्यात आली होती.
दोन दिवसांत कामे पूर्ण करणार
नालेसफ ाईची ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ज्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी असतील, त्या ठिकाणची कामे त्वरित पूर्ण करण्यात आली आहेत. येत्या २ ते ३ दिवसात सफाईचे पूर्ण केले जाणार आहे, तशी बैठकही आयुक्तासमवेत झाली आहे.
-मिनिनाथ दंडवते, आरोग्य अधिकारी