शिरूर शहराला दूषित पाणी : पाचंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:08 IST2021-03-30T04:08:12+5:302021-03-30T04:08:12+5:30

शिरूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने मैला, केमिकलमिश्रित दूषित पाणी पाजले जात असल्याचे नगरपरिषदेकडूनच कबुली दिली असल्याने आता शिरूरकरांनी ...

Contaminated water to Shirur city: Pachange | शिरूर शहराला दूषित पाणी : पाचंगे

शिरूर शहराला दूषित पाणी : पाचंगे

शिरूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने

मैला, केमिकलमिश्रित दूषित पाणी पाजले जात असल्याचे नगरपरिषदेकडूनच कबुली दिली असल्याने आता शिरूरकरांनी हे पाणी पिऊ नये, असा फतवाच नगरपरिषदेने काढला आहे. शिरुर नगर परिषद पाणीपुरवठा विभागाची लक्तरे यामुळे समोर आली असल्याचे भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगून नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

नगरपरिषदेच्या नावाने एक निवेदन सार्वजनिक करण्यात आले आहे. यावरून ही माहिती समोर आली आहे.

शिरुर शहर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद यांना शिरुर शहरातील दूषित पाण्याच्या संदर्भात आंदोलनाचे निवेदन देण्यात आले. इतरही काहींनी दूषित पाण्याची तक्रार केली. त्यानंतर नगरपरिषदेने निवेदन जाहीर केले आहे.

नगरपरिषदेचे निवेदन वाचून आश्चर्य वाटले आणि संतापही आला .शिरूर शहरातील नागरिकांना चक्क मैलायुक्त, रसायनमिश्रित पाणीपुरवठा नगरपरिषद करते?

रसायनमिश्रित पाणी कोणत्या कंपन्यांचे? सदर कंपन्यांना अभय कोणाचे? असा सवाल पाचंगे यांनी केला आहे.

Web Title: Contaminated water to Shirur city: Pachange